केशवराज बाबासाहेब यात्रेनिमित्त सेलूत “केशवराज फेस्टिवल २०२२ ” चे आयोजन

0 219

सेलू, प्रतिनिधी – शहराला लाभलेला सामाजिक व सांस्कृतिक वारसा समृद्ध व वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या महान यात्रामहोत्सवानिमित माजी जी प सभापती अशोकराव काकडे यांच्या वतीने श्री केशवराज फेस्टिवल २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

dr. kendrekar

 

२८ नोव्हेंबर सोमवार ते ३० नोव्हेंबर बुधवार या कालावधीत नूतन विद्यालयाच्या मागील प्रांगणात होणार असलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

shabdraj add offer

 

यामध्ये दि २८-नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मा .आ. विजयराव भांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व कर्जत येथील ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज यांच्या कीर्तन संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

२१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकार प्रस्तुत “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा “हा विशेष कार्यक्रम होणार असून यामध्ये महिलांना सहभागी होता येणार आहे .यामध्ये गप्पा गोष्टी ,रंजत खेळ ,हिंदी मराठी गाणी व सोबत गावरान कॉमेडी चा तडका होणार आहे .यामध्ये लाखो रुपयांची एकूण १२१ परितोषके ठेवण्यात आली आहेत .प्रथम पारितोषक टू व्हीलर तर दुसरे रेफ्रिजरेटर ठेवण्यात आले आहे .सोबत ७ पैठणी , मिक्सर ,कुकर,२५ सिल्वर ज्वेलरी सेट , २५ साडी ,१० बैंगल बाक्स ,१० लेडीज पर्स यासह इतर देखील परितोषके ठेवण्यात आली आहेत.

 

३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कलारंजना मुबंई निर्मित ४० सहभागी कलाकारांचा “मराठी पाऊल पडती पुढे” हा सांस्कृतिक कार्यक्रम व नुकताच परमवीर अब्दुल हमीद पुरस्कार प्राप्त केलेले सेलूचे भूमिपुत्र रामप्रसादजी घोडके यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा ठेवण्यात आला आहे.

 

तरी सर्व शहरातील व परिसरातील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन या बहारदार कार्यक्रमाचे आयोजक जी प चे माजी सभापती अशोकराव काकडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!