संविधान दिनानिमित्त जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

0 15

पुणे, प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात 26 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त ‘जगदीशब्द फाउंडेशन महाराष्ट्र’ च्या वतीने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक, व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ही निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सर्व वयोगटासाठी “लोकशाही भारतातील संविधानाचे महत्त्व” हा एकच विषय देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही, निबंध लेखनाला शब्द मर्यादा नाही.

सर्व विद्यार्थी व जनतेला संविधानाप्रति जागरूक करणे, त्यांच्यात संविधान विषयक चिकित्सा निर्माण करणे, प्रत्येक घरात संविधान पोहचवने, विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे असे ओहोळ यांनी सांगितले.

स्पर्धकांनी आपले निबंध २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पीडीएफ स्वरूपात
9975604298 / 9960740420 /9763561246 या क्रमांकावर व्हाट्सएपला पाठवावेत, सहभागी व विजेते स्पर्धकांना पुणे येथे आयोजित कार्यक्रमात संविधान प्रत, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याबाबत फाउंडेशन कडून सहभागी स्पर्धकांना वेळोवेळी कळविण्यात येईल. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!