पंढरपूर सायकल वारी… लयभारी

0 107

जिथे आयोजक, संयोजक,मार्गदर्शक, खंबीर असतात. तिथे ध्येय साध्य करायला काहीच अवघड नसते. यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली सर्वांची लाडकी पंढरपूर सायकल वारी. पांडुरंगावर श्रद्धा स्वतःवर आत्मविश्वास,शक्ती आणि पांडुरंगावर निस्सीम भक्ती या जोरावर परभणीच्या मावळ्यांनी पंढरपूर जिंकले.
परभणी सायकलर्स म्हणजे ध्येयवेडे…. स्वयंशिस्त…. आणि सामाजिक बांधिलकी जपणारे तरुण आणि त्यात भर म्हणजे, परभणीतील चार S.R.(BRM) दांडगा अनुभव असलेले सोबतीला होते.
त्यात अधिकच भर म्हणून दोन महिला डॉक्टरांचा वारीत विशेष सहभाग….. पहिल्यांदाच निघालेल्या दोन रणरागिणी ची राईड म्हणजे मुक्ताईच्या शब्दांना जिवंत करण्यासारखे आहे. मुंगी उडाली आकाशी। तिने गिळीले सुर्याशी।। (मुंगी हे सूक्ष्म जीवात्म्याचे रूप… ते परमात्म्याशी एकरूप झाली असता सहज सूर्यालाही पोटात घेऊ शकते)
बहुतांश महिला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडण्याकरिता आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी कमी वयात असतांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.अशा महिलांना प्रेरित करण्यासाठी परभणी येथील प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉ.गीतांजली मोरे व प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ.पल्लवी पवार या दोन महिला आरोग्याचा संदेश घेऊन सायकल वारीत सहभागी होत्या.हे या वारीचे विशेष आकर्षण…..
आजच्या स्पर्धेच्या युगात एकमेकांच्या बोकांडीवर पाय देवून पुढे जाणाऱ्यांनो हे पण लक्षात घ्या.हातात हात घेउन हृदयास हृदय जोडून “लक्ष्य” साध्य करता येते. हे ज्ञानराज खटिंग व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ऐतिहासिक पंढरपूर सायकल वारीच्या रूपाने दाखवून दिले आहे.
आजच्या महागाईच्या जमान्यात 3500 चा आकडा जरी मोठा वाटत असला तरी, त्यात डोंगराएवढं नव्हे तर चक्क पर्वताएवढे आनंद लुटता येतो, याची अनुभूती देणारे ज्ञानराज खटींग, प्रमोद शिंदे,विलास वारळ,राम कराळे, डॉ.गोपाळ खटिंग,S.R. संतोष चव्हाण, शंकर अण्णा, तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला शब्दही माझे फिके पडतील.
राईड हि एका नाण्याची बाजू असली तरी, दुसरी बाजू संयोजकाचे अथक परिश्रम असतात. आपल्या परिश्रमाचे फलित म्हणजे पंढरपूर सायकल वारी आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही. अतिशय नियोजनबद्ध प्रत्येकाची काळजी घेऊन ही वारी आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाली. यासाठी माझ्या सर्व बंधू भगिनी चे देखील आभार मानायला हवे.
24 तारखेला ठीक पाच वाजता पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ,श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय,(पंढरीनाथ भंडरवाड कि जय) छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय,असे म्हणत सर्व देव-देवतांच्या कृपा आशीर्वाद घेऊन,परभणीतील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.केदार खटींग यांनी सायकल वारीला हिरवा कंदील दिला.
पहाटेची कडाक्याची थंडी,आणि स्ट्रीट लाइटचा अंधुक प्रकाश….. आणि त्या प्रकाशातुन वाट काढणारे लक्षवेधी सायकल वारकरी……लुकलुकणारे लाल टेल लँम्पची रांग बघून जुनू दिव्याची आरासच लागली की काय असे वाटायचे.
सर्वप्रथम नरसिंह पोखरणी येथे कुडकुडत गरमागरम चहाचा आस्वाद घेतला.पुढे गंगाखेड येथे S.R.सूर्या बडवणे व गंगाखेड सायकलच्या वतीने उत्तम प्रकारचा नाष्टा केला होता. नाश्ता इतका चविष्ट होता की त्याला काय उपमा द्यावी. आणि नाश्त्याच्या सोबतीला गंगाखेडची प्रसिद्ध ग्यानू मामाची कलम गोपाळ कात्रे यांनी प्रत्येक रायडरला 100 ग्राम कलम दिली.
या सर्वांचे आभार मानण्यासाठी आमच्या सोबत मोती नमकीन सर्व ठिकाणी हजर ,प्रत्येक अन्नदात्या मोती नमकीन चे गिफ्ट व विठ्ठलाची फोटो भेट देण्यात आले.यात मोती नमकीन चा सर्वात मोठा वाटा आहे. आमच्यासोबत गणेश खटिंग धोती वाले मामा होते म्हणून कोणी तरी म्हटलं की बॅकअपला होती धोती आणि खायला होता मोती.
पुढे वारी परळीच्या दिशेने निघाली, परळी येथे शनेश्वर प्रतिष्ठानकडून प्रत्येक रायडरला एक लिटर शरबत देण्यात आले. त्या शरबताने इतकी ऊर्जा निर्माण झाले की, परळी चा घाट आम्ही कसा चढलो कळलेही नाही. पुढे अंबाजोगाई येथे दुपारचं जेवण प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर भालेराव दादा यांच्या सासरवाडीत त्यांच्याकडूनच अस्सल गावरान मराठमोळे जेवण देण्यात आले.या जेवनातील मठा हे विशेष आकर्षण होते. प्रत्येक रायडरने मठ्या वर ताव मारला.आणि तेथेच पेंगू लागले.
तेवढ्यात ज्ञानराज खटिंग सर चे मार्मिक शब्द कानी पडले. चला उठा वारकऱ्यांनो, हे शब्द ऐकताच सर्व रायडर कळंब कडे कूच केली. इथे मात्र आमच्या एका मावळ्याला उलट्या झाल्या. लगेच त्यांना बॅकअपव्हँन मध्ये बसवुन,आम्ही कळंब कडे निघालो. वाटेत होळ येथे सोबत घेतलेले लस्सी प्रत्येक रायडरला देण्यात आली.आणि इथे पण आमचा एक मावळा थकला त्यांनासुद्धा बॅकअप व्हन मध्ये बसवुन, आम्ही कळंब कडे निघालो.
वाटेत एक अनोळखी रायडर भेटले, त्यांनी पिसेगाव येथे थांबून चहा पाण्याचा आग्रह केला.आम्ही सुद्धा त्यांचा आग्रहाला मान देऊन चहाचा आस्वाद घेतला. थोड्या गप्पा मारल्या आणि कळंब कडे निघालो.
कळंब मध्ये गेल्यानंतर बंडोपंत दशरथ यांच्या घरी संध्याकाळचे जेवण, पिठलं भाकरी अतिशय सुंदर जेवणाचा आस्वाद घेतला. आणि येडेश्वरी लॉज येथे मुक्काम केला. एकंदरीत पहिल्या दिवशी प्रत्येक रायडरला फक्त राहण्याचा खर्च द्यावा लागला. उद्देश हा एकच होता की प्रत्येक रायडरला कमीत कमी खर्च आला पाहिजे.
असे करता करता दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी शंकरअण्णा फुटके यांच्या भाच्याने चहा-बिस्कीट आणली. सकाळच्या थंडीमध्ये बिस्किटचा आस्वाद घेऊन, पुढे येरमाळा येथे डॉ.मार्डीकर साहेब यांच्याकडूनही च्या बिस्किटाचे आयोजन झाले. तेथेसुद्धा चहा बिस्कीट घेतले.
पुढे पाथरा येथे डॉ. केदार खटींग सर यांच्याकडून उत्तम प्रतीच्या नाष्ट्याचे आयोजन करण्यात आले.तेथे भरपेट खिचडी व कडीवर ताव मारला, व वारी बार्शी कडे निघाली.
बार्शी येथे बार्शी सायकलिंग ग्रुपच्या वतीने आग्रहाने थांबून, प्रत्येक रायडरला एक एनर्जी ड्रिंक देण्यात आले.थोडा वेळ बसून गप्पा मारल्या, परिचय करून घेतला,व वारी पुढे शेंद्री कडे निघाली.
शेंद्री येथे दुपारचे जेवण इंजि.दीपक चव्हाण सर यांच्याकडून देण्यात आले.जेवण उत्तम प्रतीचे होते.अतिशय चविष्ट अशा जेवणाचा आस्वाद घेऊन थोडी वामकुक्षी घेतली. व पुढे माढ्यात पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे तिथे आम्हाला चरण स्पर्श करून घेण्याची संधी डॉ. मार्डीकर साहेब यांच्यामुळे मिळाली.
उपळाई येथे मुक्कामाच्या दिशेने वारी रवाना झाली. परभणीचे आरटीओ नखाते साहेब यांच्या फार्म हाऊस कडे जात असताना.
खडखड रस्त्याचा धडधड प्रवास प्रत्येक रायडरने अनुभवला साहेबांच्या फार्महाऊसवर पोहोचलो नकाते साहेब स्वागताला उभे होते.
सर्व रायडर फ्रेश होऊन गावरान पद्धतीने बनवलेली सोलापूरची प्रसिद्ध भाजी, बाजरीची भाकरी,कोशिंबीर,भात कुसकरून खाल्ली.जेवण अप्रतिम होते. रात्री कँम्पिग चा आनंद घेतला जिजाऊ ज्ञानतिर्थ चे संचालक,प्राचार्य नितीन लोहट सरांच्या *एक प्यार का नगमा है या गाण्यावर माऊथ आँरगाँन ने सर्वांची मने जिंकली. नवे तर सर्व भाऊक झाले.प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर केले. गाणी म्हटली, गोष्टी सांगितल्या,R.T.O साहेबांनी ही भरभरून दाद दिली.
वारीत कुठेच काही कमी नव्हती. प्रत्येकाचा आनंद ओसंडून वाहत होता. सर्वच सायकल वीर एका कुटुंबाप्रमाणे वागात होते.
26 तारखेला सकाळी श्री नकाते साहेबाच्या फार्महाऊसवर चहा घेऊन, साहेबांनी जवळपास 10 Kआम्हाला सोडण्यासाठी आले. आम्ही तेथून शेटफळ कडे रवाना झालो. शेटफळे येथे नितीन लोहट सरांचे मित्र अभिमान गायकवाड यांनी चहा बिस्किटांचा बेत आखला होता. तिथून चहा व बिस्किट यावर ताव मारून.
पंढरपूर कडे जात असताना अंगुरा च्या बागा,डाळिंबाच्या बागा,बोराच्या बागा,पपईच्या बागेत फोटो काढून आनंद घेत पंढरपूरला पोहोचल्यावर.
300 KM अंतर प्रत्येक रायडरने पार केले. या आनंदाला सीमा नव्हती. एक नवीन इतिहास प्रत्येक रायडरने रचला होता.
सायकल वीराने संयोजक, आयोजक, मार्गदर्शकाच्या सहाय्याने हा इतिहास रचला होता. पुढे पंढरपूर येथे प्रसिद्ध बालाजी इडली आमची वाट पाहत होती. तेथे मकरंद कौलवार यांनी खूप छान,गरम इडली व चटणी चे नाश्ता दिला.येथे सुद्धा भरपेट खाऊन
पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व सायकल वीर रवाना झाले. पांडुरंगाच्या मंदिरला विठू नामाच्या जयघोषात, दोन प्रदक्षिणा घालण्यात आल्या. सर्व पंढरपुर नगरी सायकली कडे पाहून दंग झाली होती. एवढी मोठी 35 जणांची राईड, शिस्तबद्ध लाईन, हे पाहून तेथील पोलिस यंत्रणा सुद्धा कौतुकाने पाहत होती.आणि तो आनंद कितीही पैसे देऊन घेता येण्यासारखा नव्हता.
नंतर लॉजवर जाऊन फ्रेश झालो.
सर्वात अवघड काम म्हणजे सायकल टेम्पोत लोड करणे. काम बघताना नकळत डोळे पाणावले, धन्य तुमची थोरवी मित्रांनो,
सायकल लोड करून टेंम्पो पुढे परभणीला पाठवून दिला. व पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्वजण गेलो. दर्शन घेऊन मन भारावून गेले. दर्शनाच्या रांगेतच, आमचे मित्र दिनेश बिंदू यांनी तंबाखू सोडण्याचा संकल्प केला.आणि तेथेच तंबाखू चुना फेकून दिला.ही होती पांडुरंगाची ताकद.
पुढे मानकरी, अन्नदाते यांच्यासाठी प्रसाद,अबिर,गुलाल,पांडुरंग चा फोटो खरेदी केला.
पंढरपुरातील प्रसिद्ध वासकर वाड्याला भेट दिली. मोती नमकीन चे गिफ्ट ओम शेठ नि दिलेले, वासकर फॅमिलीला देण्यात आले
त्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण हॉटेल व्हेज ट्रीट या ठिकाणी घेतले या जेवणाच्या अन्नदाते हर्षद कत्रुवार,दिनेश बंधू, प्रमोद शिंदे, वागेश पोपडे हे होते.जेवण खूप छान होते.जेवण करून आम्ही कुर्डुवाडी पर्यंत क्रूजर गाडी निघालो. नंतर कुरूडवाडी ते परभणी पनवेल एक्सप्रेस ने प्रवास केला. सकाळी सात वाजता परभणीत पोहोचलो. आणि प्रत्येक रायडर आपापल्या कामाला लागला .
लगेच दुसऱ्या दिवशी डॉ. गोपाळ खटिंग यांना बंगलोरला जायचे असल्यामुळे, प्रत्येक रायडर्सचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांना प्रेरणा भेटली पाहिजे, म्हणून स्नेहभोजन व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यातही आमचे मोती नमकीन कुठेही कमी नव्हती. प्रत्येक रायडरला मोमेंटो व मोती नमकीन चे गिफ्ट देण्यात आले.अशा पद्धतीने वारीचा समारोप हॉटेल आपली चूल या ठिकाणी करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ.गणेश चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव अस्थिरोग तज्ञ डॉ.केदार खटिंग,मोती नमकिन चे मालक ओमशेठ हे उपस्थित होते.
हि ऐतिहासिक राइड खालील मित्रांच्या वरिष्ठांच्या सोबतीने कायम स्मरणात राहील त्यात, डॉ.संदीप मोरे, डॉ.संतोष जाधव,शंकरअण्णा,प्रमोद शिंदे ,सूर्या बडवणे ,ज्ञानराज खटिंग, कृष्णा जावळे, किशोर शिंदे ,कैलास तिथे ,दिनेश गव्हाणे, संतोष चौधरी, संतोष चव्हाण, राम कराळे ,ज्ञानबा मापारी ,राहुल भिसे, दिनेश बिंदू ,वागेश पोपडे,विकास वारल, विलास वारल, नितीन लोहट, दीपक शिंदे, डॉ.सतीश पवार, डॉ. गितांजलीताई, डॉ. पल्लवी ताई, डॉ.गोपाळ खटिंग, अनिल कांबळे, खुद्दस भाई ,आनंद पवार,
काही प्रसंग, घटना, व्यक्तीची नोंद राहिली असल्यास छोटा भाऊ समजून मोठ्या मनाने माफ करावे. या वारीच्या निमित्ताने नवीन मित्रपरिवार लाभला खरोखरच पांडुरंगाचे मनापासून आभार मानतो.
शब्दांकन/लेखन
🚲S.R.प्रद्युम्न शिंदे 🚲
परभणी mob-9822252524

error: Content is protected !!