पानटपरी चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल

0 165

नारायण पाटील
सेलू,दि 11 ः
प्रतिकूल परिस्थिती असली तरी मनात जिद्द व कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणत्याही यशाला गवसणी घालता येते .हेच सेलूच्या एका पान टपरी चालकाच्या मुलाने दाखवून दिले आहे .कठोर परिश्रम व जिद्दीच्या बळावर तो नुकताच सनदी लेखापाल बनला असून एक आदर्श ठरत आहे .
मूळ राजस्थान येथील असलेले गौड कुटूंब पाच पिढ्यापासून सेलू येथे स्थायिक झालेले आहे .त्यामध्ये वडील हॊटल व्यवसायात असतांना या कुटूंबातील केवळ आठवी पास असलेल्या बिजू गौड याने गेल्या तीस वर्षापासून सेलू येथे पान टपरी व्यवसाय सुरू केला .व या व्यवसायावरच त्याचा कुटूंबाचा उदर निर्वाह चालतो . त्यांना करण व अर्जुन ही दोन मुले आहेत .अर्जुन चे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले असून तो व्यवसायात वडिलांना मदत करतो .परंतु करण मात्र पूर्वीपासून शिक्षणाच्या बाबतीत जिद्दी होता .त्याचे प्राथमिक शिक्षण येथील नूतन विद्यालयात झाले .१० वी कॉमर्स व १२ वी कॉमर्स ला तो तालुक्यातून प्रथम आला .पुढे त्याने एम कॉम चे शिक्षण संभाजीनगर येथे देवगिरी महाविद्यालयात पूर्ण केले .आपला मुलगा सी ए व्हावा ही असलेली वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकौंटट ऑफ इंडिया या संस्थेत प्रवेश घेतला .दिल्ली येथे मुख्य शाखा असलेल्या या संस्थेची संभाजीनगर येथे एक शाखा आहे .,तिथे करण याने सी ए चे शिक्षण पूर्ण केले .वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द त्याने उराशी बाळगून त्याने संस्थेच्या ग्रँथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकातूनच जवळपास दररोज १२ तास अभ्यास केला .अपार मेहनत घेऊन देखील त्याला दोन वेळा अपयश आले परंतु सी ए होण्याची असलेली आकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती .त्यामुळे त्याने अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला . व त्याला यावर्षी यश मिळाले व तो सनदी लेखापाल ( सी ए ) बनला आहे .आपण जरी प्रयत्न केले असले तरी आई वडिलांचे व गुरुजनांचे आशीर्वाद हेच या यशाचे खरे भागीदार असल्याचे त्याने सांगितले आहे .

आपल्याला महाविद्यालयीन शिक्षणापासून प्रा संजय पिंपळगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे .भविष्यात आपण सीसा ( cisa ) व डीसा (disa ) हे कोर्स पूर्ण करून वरीष्ठ सनदी लेखापाल होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत .व कितीही मोठे झालो तरी सेलू शहराचे नावं मोठे करण्यासाठीच आपण प्रयत्न करू .विद्यार्थ्यांनी अपयश आले तरी निराश होऊ नये व जिद्द कायम ठेवावी .असे आवाहन देखील करण याने केले आहे .

error: Content is protected !!