मराठी भाषा रसिक मंडळाच्या वतीने परभणीत तिघांचा सत्कार

बा.बा. कोटंबे,  सेलुकर सह भावसार सन्मानित

0 38

परभणी दि. 10 (प्रतिनिधी) ः
परभणीतील मराठी भाषा रसिक मंडळाच्यावतीने सोमवार दि. ९ जानेवारी रोजी तीन राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक मित्रांचा सत्कार  प्रा. प्रभाकर हरकळ  व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  त्यात कादंबरीकार बा. बा. कोटंबे, जि. प. शिक्षक संतोष सेलुकर, जि. प. शिक्षक प्रेमेंद्र भावसार यांचा सत्कारमूर्ती म्हणून  समावेश होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी मोहन कुलकर्णी हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रभाकर हरकळ सरांनी कोटंबे यांच्या कदाचित या राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरीवर समिक्षणात्मक विवेचन श्रोत्यांसमोर मांडले.

परभणी येथील कादंबरीकार बा. बा. कोटंबे यांच्या ‘ कदाचित’ या मराठी कादंबरीला मध्य प्रदेश  शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने भा. रा. तांबे पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. ५१ हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून मध्यप्रदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. त्यानिमित्ताने येथील मराठी भाषा रसिक मंडळाने त्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प. परभणीचे शिक्षक श्री संतोष सेलुकर व श्री प्रेमेंद्र भावसार यांना नुकताच घोषित झाला आहे. त्यानिमित्त त्यांचाही सत्कार मंडळाच्यावतीने यावेळी करण्यात आला. सत्कार मूर्तींनी सत्काराला उत्तर देताना भाषाप्रेमींचे ऋण व्यक्त केले. प्रा. हरकळ यांनी कदाचित कादंबरीचे कथासूत्र सांगून कादंबरीची बलस्थाने सांगितली. हा कार्यक्रम येथील गणेश वाचनालयाच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुरा उमरीकर यांनी केले तर सूत्रसंचलन दिनकर देशपांडे यांनी केले. यावेळी  सौ. सुवर्णा मुळजकर, सौ. सविता देशपांडे, सौ. भावसार, सौ. सारिका सेलुकर,  सौ. प्राजक्ता कंधारकर, शिवाजी आरळकर, दिलीप चारठाणकर, कंधारकर, संदिप पेडगावकर, कृष्णकुमार इनामदार यांच्यासह बहुसंख्य रसिकांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!