तपश्चर्या जीवनाचा प्रकाश आहे – साध्वी उदिताजी म. सा.

0 10

 

हिंगणघाट, प्रतिनिधी – श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, वर्धमान अयंबल तपोनिधी प.पू.प्रफुल्लजी म.सा. चे सुशिष्या प.पू. डॉ. उदिताजी म.सा., प.पू. विशुद्धिजी म.सा., प.पू. गरिमाजी म.सा. ठाणा हे 3 चातुर्मासासाठी विराजमान आहे.
साध्वी उदिताजी म.सा. यांनी धर्मसभेला संबोधित करताना सांगीतले की दान, नम्रता, तप आणि भावना ही मोक्षमार्गाची चार साधने आहेत. तपस्या हेच कर्माच्या निर्जराचे साधन आहे. तपश्चर्या केल्याने आत्मा शुद्ध होतो, तपस्याबरोबर नामस्मरणही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक जन्मांचे संचित कर्म केवळ तपश्चर्याने नष्ट होते. तपश्चर्येसोबतच भावनेलाही विशेष महत्त्व आहे. जीवनाचा खरा आनंद त्यागात आहे.

ज्याप्रमाणे अग्नीच्या उष्णतेने सोने कुंदन बनते, कपडे साबणाने आणि पाण्याने स्वच्छ होतात, त्याचप्रमाणे आत्म्यावरील कर्माची मलिनता, तपस्येच्या पाण्याने साफ होऊन आत्मा कुंदनासारखा पवित्र व शुद्ध होतो. जगातील सर्व धर्मांनी तपस्याचे महत्त्व ओळखले आहे. तप म्हणजे तापवणे म्हणजे आपल्या इच्छा दाबणे. तप ही ज्योत आहे, तपश्चर्या प्रकाश आहे. मनातील विचार ज्योतीप्रमाणे नष्ट करणे. ज्योती म्हणजे नवीन शक्ती आणि ऊर्जा प्रसारित करणे. आपल्या तीर्थंकरांचे जीवन तपाने भरलेले आहे. देवतांनाही तपश्चर्या करून मानवाचा दर्जा प्राप्त करण्याची इच्छा असते.

 

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष भागचंद ओस्तवाल म्हणाले की, अनेक श्रावक आणि श्राविक गरम पाण्याच्या आधारे घोर तपश्चर्या करत आहेत. यावेळी सौ. सुनीता हरीश कासवा आणि सौ. सविता जयकुमार मुणोत यांनी 9 उपवासचे पच्चखान साध्वी वंदृ यांच्याकडुन घेतले आहेत. आणि सौ. रिषिका राहुल बैदचा 16 उपवासचे पच्चखान 31/07/2022 रोजी श्री जैन मंदिरजी उपाश्रय येथे संपन्न होणार असून सकाळी 8.30 वाजता तपश्चर्या अनुमोदनार्थ जलधारा वरघोडा आयोजन करण्यात आले आहे.

 

शुक्रवारी दि. 29 जुलै 2022 रोजी साध्वी वृंद यांच्या उपस्थितीत श्रमण संघाचे द्वितीय आचार्य सम्राट पू. आनंदऋषीजी म.सा. आणि महाराष्ट्र प्रवर्तनी पू. प्रभाकंवरजी म.सा. यांची जयंती तपस्या व त्यागाने साजरी करण्यात आली, त्यामध्ये सर्व बंधू भगिनींनी सह-जोडे मध्ये नामस्मरणाचा लाभ घेतला.
कार्यक्रमात भागचंद ओस्तवाल, दिनेश कोचर, पुखराज रांका, अनिल कोठारी, श्रीचंद कोचर, प्रसन्न बैद, विजय कासवा, शेखर मुणोत, राजेंद्र डागा, शांतीलाल कोचर, प्रदिप कोठारी, पारसमल मुणोत, सुभाष ललवानी, हरिश कासवा, राजेंद्र मुणोत, शेखर चोरडिया, कमलकिशोर रांका, रितेश ओस्तवाल, विजय मुथा, राजेंद्र सिंघवी, राजेश कोचर, नरेंद्र बैद, किर्ती सुराणा, ऋषभ सिंघवी, चेनकरण कोचर, खुशालचंद चोरडिया यांच्यासह समाजातील सर्व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या. अशी माहिती राजेश अ. कोचर यांनी दिली.

error: Content is protected !!