दानशुर व्यक्तींनी समाज उपयोगी कार्यास आर्थिक सहकार्याने मदत करावी-अॅड विष्णू ढोले

एका वर्गातील सर्व विद्यार्थी शालेय साहित्यासाठी दतक घेणार-सुनील गायकवाड

0 64

परभणी,दि 11ः
दि 11 ऑगस्ट रक्षाबंधनाचे औचित्य साधून शहरातील राजश्री छत्रपती शाहूमहाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
जिजामात बाल विद्या मंदिर आंबेडकर नगर सेलू येथील 61 विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले
कै. दत्तात्रय हेलसकर सर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या संकल्पनेतून मागील 5 वर्षापासून चालू असलेला
हात मदतीचा एक सामाजिक उपक्रम तुमच्या आमच्या सहकार्याने  जिजामात शाळेत संपन्न झाला

या शाळेचे अध्यक्ष डॉ अनिकेत जोगदंड, सचिव डि व्ही मुळे, प्रमुख पाहुणे अॅड विष्णु ढोले, कवी गौतम सुर्यवंशी, प्रा के डी वाघमारे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष सतीश जाधव, संयोजक सुनिल गायकवाड, निर्मिक क्लासेस चे संचालक शुकाचार्य शिंदे, आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान पावडे यांनी केले तर ते म्हणाले की हात मदतीचा सामाजिक उपक्रम राबवून गोर गरिब होतकरू विद्यार्थी शालेय साहित्यापासुन आपले शालेय शिक्षण सोडू नये या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हसु फुलविण्यात चे काम या माध्यमातून होत.

अॅड विष्णू ढोले म्हनाले की समाजात समाज उपयोगी कार्यास आर्थिक मदत व सहकार्य करून जास्तीत जास्त मदत सरवाच्या मदतीने होणे ही गरज ओळखून सुनील गायकवाड यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे मी हि पुढील नियोजनात माझे आर्थिक स्वरूपात मदत करून सहकार्य करील.

प्रा.के डी वाघमारे व कवी गौतम सुर्यवंशी यांनी या हात मदतीचा सामाजिक उपक्रम कार्यास शुभेच्छा देऊन पुढील वर्षांत मोठ्या प्रमाणात आम्ही ही आर्थिक मदत करूण सहकार्य करू असा शब्द दिला

संस्था अध्यक्ष डाॅ अनिकेत जोगदंड यांनी शाळेतील मुल खूपच गरीब घरची आहे हलाकिच्या परिस्थीत हे मुल शिक्षण घेत आहेत परंतु हात मदतीचा या उपकातुन शालेय साहित्यची मदत होते त्या बदल संयोजक सुनिल गायकवाड यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुनिल गायकवाड यांनी शालेय परिस्थीत व या भागातील उत्कृष्ट अभ्यासात हुशार असलेले व शाळेती गरिब विद्यार्थी शैक्षणिक साहित्यासाठी दतक घेण्यात येत असून पुढील वर्षांत एका वर्गातील संपूर्ण विद्यार्थी दतक घेत आहे असे जाहीर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश शेळके, तर आभार बाळू धनवे यांनी मानले.कार्यक्रमास भगवान पावडे, खापरखुंटीकर कृष्णकांत, काळे विजयमाला, कटारे विष्णू, राठोड सुनिल, सादेखा मॅडम,तुकाराम अंभुरे, लताबाई अंभोरे आदिनी परिश्रम घेतले

error: Content is protected !!