मुलाने सोशल मीडियावर शेअर केले असे फोटो; बापाला जावं लागलं थेट तुरुंगात

0 33

शब्दराज ऑनलाईन,दि 08 ः
ग्रेटर नोएडामधील दादरीमध्ये एका महिलेने हवेत गोळीबार केल्याचं प्रकरण शांत होत नाही तर दनकोरमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी बंदुकीसह सोशल मीडियावर (Social Media) फोटो शेअर केले. याचा परिणाम त्यांच्या वडिलांना भोगावा लागत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलांच्या वडिलांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दनकोर पोलिसांनी सांगितलं की, शनिवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. दनकोरमधील दोन अल्पवयीन मुलांनी बंदुकीसह फोटो आणि व्हिडीओ शेअर केेले. या मुलांचे वय 10 आणि 12 वर्षे आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर समोर आलं की, मुलाच्या वडिलांच्या घरात 315 बोरचा अवैध बंदूक ठेवली होती. तो मुलगा शनिवारी शेजारच्यांकडे पोहोचला आणि दोघांनी हातात बंदूक घेऊन फोटो आणि व्हिडीओ शूट केला. हे सर्व त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केले. यानंतर पुढील काही तासान पोलिसांना सोशल मीडियावरुन पोस्टबद्दल माहिती मिळाली.

पोलिसांनी एका मुलाचे वडील मुकेश यांना अटक करून अवैध बंदुकही जप्त केली आहे. याशिवाय पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात रवानही केली आहे.

महिलेने केला होता हवेत गोळीबार.
तर दुसरीकडे दादरीमधील ब्रह्मपुरी भागातील निवासी महिलेचा हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी महिलेच्या बंदुकीचा परवाना रद्द करण्याची कारवाईदेखील सुरू केली आहे. 5 नोव्हेबर रोजी दिवाळीच्या रात्री अनिल शर्माच्या पत्नीने गोळीबार करीत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. पोलिसांनी दखल घेत या प्रकरणात कारवाई सुरू केली. अनिल शर्माने 10 वर्षांपूर्वी बंदुकीचा परवाना काढला होता.

error: Content is protected !!