जिंतूर येथे समीर दुधगावकर यांच्या पुढाकारातून चित्र प्रदर्शन

0 39

परभणी,दि 06 (प्रतिनिधी)ः
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिंतूर येथे मोदी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या चित्र प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे.भाजपाचे परभणी जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष शिंदे समीर गणेशराव (दुधगावकर ) यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सहा ऑक्टोबर रोजी संघाचे जेष्ठ कार्यकर्ते अँड.हरिहरराव (बापू )आनंदराव देशमुख यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ संघ कार्यकर्ते किरण वट्टमवार,अभियान संयोजक प्रमोद कराड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. पंडितराव दराडे, भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, दत्तराव कटारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना बापुंनी युवकांनी आरोग्य सांभाळावे, मोदींसारखी राष्ट्रसेवा करावी असे आवाहन केले. जिंतूर शहरातील नगरेश्वर मंदिरात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात मोदींजी च्या जीवनकार्यावर तसेच विकासकामांवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन झाल्यापासून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळ पासून विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामान्य नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत. 8 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे समीर गणेशराव (दुधगांवकर) यांनी केले आहे.

error: Content is protected !!