जाम ते पोहना दरम्यान खड्यांचे ग्रहण…महामार्गावरील खड्डे सात दिवसात बुजवा अन्यथा आंदोलन-अतुल वांदिले

0 46

 

हिंगणघाट, दि.27(प्रतिनिधी) :- हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर जाम ते पोहना दरम्यान मोठे मोठे अनेक खड्डे पडले असून काही ठिकाणी महामार्गच गायब झाल्याचे चित्र आहे. महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे तहसीलदार मार्फत केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री यांना दिले निवेदन देत त्वरित रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. पुढील सात दिवसांत रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहेयांमुळे वाहन चालवावे की रस्ता शोधावा हाच मोठा प्रश्न राष्ट्रीय महामार्गवरील वाहनचालकांना पडलेला आहे .

जाम ते पोहना दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्यातुन कारचा पुर्ण चाकच शिरतो आहे. या खड्यांमुळे अनेक कार व ट्रक चा अपघात हा नित्याचा झाला आहे. एकीकडे महामार्ग सुरक्षा नावावर जाहिराती होतात, तर दुसरीकडे महामार्गावरील खड्डे महामार्ग असुरक्षित झाल्याचे सर्वांना प्रचेती देत आहे.या महामार्गावरील खड्यात अनेक वाहने नित्याने अपघातग्रस्त होत असू. अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागत आहे.एकीकडे दारोडा टोल नाक्यावर टोल वसुली करून रस्त्याची देखभाल दुरुस्तीसाठी म्हणून हा टोल वसूल करतो असे सांगणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या महामार्ग रस्त्याची देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या कंत्राटदारावर दबाव टाकून रत्याचे काम करून घेण्यात सपशेल अयशस्वी ठरत आहे.आपण त्वरीत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महामार्ग कंत्राटदार यांना आदेश द्यावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी तहसीलदार मार्फत परिवहन मंत्री यांना दिले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह लक्ष्मण थुल,अर्जुन वैरागडे, महादेव सुरजूसे, संजय थुल, बडुजी काटकर, रितेश काटकर, गौरव तलमळे, वामन काटकर, प्रमोद मेंढे, ज्ञानेश्वर मेंढे, विठ्ठल शेंडे, रामदास तपासे, रामराव गिरडे, अशोक चाफले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!