रायपूर येथे १७ जुगार्‍यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;२५हजार५००रुपयांचा मुद्देमाल जप्त

0 77

 

 

 

 

सेलू, प्रतिनिधी – तालुक्यातील मौ. रायपूर येथे एका शेतात अंदर -बाहर नावाचा जुगार सुरु असताना सेलू पोलिसांनी छापा मारुन १७ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई रविवार २६ डिसेंबर रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी सपोनि. सरला गाडेकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलू तालुक्यातील मौ. रायपूर येथे बड्डा गाडेकर यांच्या शेतात पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती सेलू पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी रविवार २६ डिसेंबर रोजी छापा मारला. यावेळी अंदर बाहर नावाचा जुगार पैसे लावून सुरु असल्याचे दिसून आले.  पोलिसांनी रोख ६ हजार ३६० रुपये, जुगाराचे साहित्य व मोबाईल असा एकुण २५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी जुगार खेळणार्‍या योगेश गाडेकर, भिमराव उंडे, नितीन काकडे, राजेभाऊ काकडे, लक्ष्मण गाडेकर, महेश गाडेकर, उत्तम ढाकरगे, बड्डा गाडेकर, शिवाजी हिंगे, पप्पु गाडेकर, राजेभाऊ गाडेकर, भारत गाडेकर, राहूल हिंगे, लखन गाडेकर, अशोक गाडेकर, देवराव अंभोरे, राजूभाऊ हिंगे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सुनील वासलवार हे करत आहेत.

error: Content is protected !!