काॅफी शाॅपमध्ये सुरु होते अश्लील चाळे; 9 मुली आणि 6 मुलं ताब्यात

0 837

नांदेड – नांदेड शहरात कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करताना काही युवक युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या दामिनी पथकाने आनंद नगर भागातील राज मॉल येथील कॉफी शॉपवर धाड टाकत ही कारवाई केली.

कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या युगुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जोडप्यांना बसण्यासाठी गुप्त जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे छेडछाडीच्या घटना वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या युगुलांपैकी अनेक जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. नांदेडमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

शहरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, कैलासनगर, आनंदनगर, श्यामनगर परिसरात कॉफी शॉप, नेट कॅफे, लंच पॉईंटच्या नावाने दुकाने उघडली आहेत. यातील बहुतांश दुकानदारांनी आतील बाजून अंधारमय खोली करुन बसण्याची व्यवस्था केली आहे. बाहेरुन जाणाऱ्यांना आतील काहीही दिसत नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी मुला- मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र कंम्पार्ट बनविले आहेत. या ठिकाणी बसण्यासाठी तासानूसार पैसे आकारले जातात. परंतू यातून अश्लिल चाळे करणाऱ्यांना हक्काच्या जागा उपलब्ध होऊन छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी आनंदनगर भागात टाकलेल्या धाडीत पकडलेल्या सर्व मुली अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना कळवून त्यांना समज देण्यात आला. त्यानंतर त्यांना सोडले. परंतू पोलिसांकडून या परिसरात धाडीचे कारवाई सत्र सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

error: Content is protected !!