चितेगाव फाटा येथे वीज ग्राहक संवाद व मेळावा संपन्न

0 18

रामभाऊ आवारे.
निफाड,दि 23 ः
ओझर महावितरण उपविभाग अंतर्गत चितेगाव फाटा येथे सोमवारी (दि.22) गोदाकाठ परिसरातील गावांचा कृषी ग्राहक संवाद व मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. मुख्य अभियंता कुमठेकर तसेच मा.अधीक्षक अभियंता, पडळकर व मा.कार्यकारी अभियंता, डोंगरे उपस्थित होते. तसेच गोदाकाठ परिसरातील वीज ग्राहक या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर मेळाव्याप्रसंगी जि. प. सदस् सुरेश कमानकर , सिद्धार्थ वनारसे, शेतकरी प्रतिनिधी व माजी जि. प. उपाध्यक्ष दिगंबर गीते, पंचायत समिती सदस्य व सर्वपक्षीय पदाधिकारी , इतर गावातील सरपंच व उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
तसेच सदर प्रसंगी शेतकरी बांधवांनी विजेसंदर्भातील आपले विविध समस्या मांडल्या. मा. मुख्य अभियंता कुमठेकर यांनी शेतकऱयांच्या समस्यांचे निराकरण केले. मा. अधीक्षक अभियंता नाशिक शहर मंडळ पडळकर यांनी कृषी धोरण बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मा. कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी शेती पंपाचे वीज बिल भरण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले. सदर आवाहनानुसार शेतकरी बांधवांनी रुपये ५१,००,०००/- इतका कृषी पंपाच्या बिलाचा भरणा करून महावितरणच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महावितरण चे प्रभारी उपकार्यकारी अभियंता विशाल मोरे, चांदोरी ग्रामीण कक्षाचे सहाय्यक अभियंता देशपांडे , सायखेडा कक्षाचे सहायक अभियंता कातकाडे तसेच म्हाळसकोरे कक्षाचे कनिष्ठ अभियंता सौ. वासनिक व सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

 गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट केल्यास आंदोलन – खंडु बोडके पाटील.
निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन थकीत बिलांअभावी कट करू नये अशी आग्रही मागणी करत करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना आक्रमकपणे मांडत तीव्र जणआंदोलनाचा इशारा दिला.आज वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर व कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांच्या उपस्थितीत चितेगाव फाटा येथील कुलस्वामिनी लॉन्स येथे शेतकऱ्यांचा ग्राहक संवाद मेळावा झाला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. गोदाकाठचे शेतकरी अस्मानी संकटामुळे उध्वस्त झाले असून थकबाकी वसुलीमुळे त्रस्त झाल्याचे विशद करत आक्रमक भूमिका मांडली. चालू बिले भरण्यास शेतकरी तयार असून थकीत बिलांसाठी तगादा लावल्यास टाळे लावा आंदोलनाचा इशारा यावेळी बोडके-पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांना विजेच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास खंडू बोडके-पाटील यांच्या ७५८८०३६४३६ / ९२२६१०२०७६ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!