ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रकाश दायमा यांची निवड

0 13

निफाड,दि 24 (प्रतिनिधी)ः
नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तथा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश मोतीलाल दायमा यांची ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंदजी दवे यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे.
लासलगाव सह परिसरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारेे प्रकाश शेठ दायमा यांची झालेली निवड असून ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमांना निश्चितच त्यांचे सहकार्य लाभणार आहे. त्यांची नुकतीच नाशिक जिल्हा मर्चंट बँकेच्या व्हा चेअरमन पदी निवड करण्यात आलेली आहे.
ब्राह्मण महासंघ संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी आज त्यांच्या पदाची घोषणा केली प्रकाश दायमा यांचे आजवरचे सामजिक कार्य बघून हे सन्मानाचे पद त्यांना देण्यात आले असे आनंद दवे यांनी सांगितले. ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष सौ स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महासंघ विश्वस्त मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप जोशी शहर अध्यक्ष भगवंत बाळासाहेब पाठक, जिल्हा युवा अध्यक्ष गणेश जोशी ,संघटक स्वाती सावरगावकर, उपाध्यक्ष अक्षदा जोशी ,शहर अध्यक्ष निकिता पाठक, प्रदेश सदस्य वैशाली जोशी, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जोशी, विशाल शिखरे, बाळासाहेब देशमुख, मनोज खेडलेकर, प्रदेश जिल्हा पदाधिकरी उपस्थित होते.
या निवडीबद्दल जि प मा अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, नाशिक जिल्हा कृ औ संघाचे संचालक काशिनाथ पाटील शिंदे, निसाका संचालक एकनाथ डुंबरे,जि प सदस्य डि के नाना जगताप, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णाताई जगताप, वारकरी महामंडळाचे दत्तात्रय डुकरे पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!