राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूर्णा शहराध्यक्षपदी प्रताप कदम

0 166

पूर्णा,दि 21 ः
सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रताप अच्युतराव कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्णा शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलीआहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रदेण्यात आले.
परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात महाराष्ट्र प्रदेशराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार १९ सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक पार
पडली. यावेळी पुर्णा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदावर प्रताप कदम यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट,नगरसेवक अमजद नुरी, नगरसेवकशेख खुद्दूस, संतोष सातपुते,सामाजिक कार्यकर्ते राजुनारायणकर, घनदाट मामा मित्रमंडळाचे शहराध्यक्ष दयानंद कदम,इश्यू पठाण, परशुराम उर्फ बाळासाहेब जोगदंड आदींचीउपस्थिती होती.

उमलते नेतृव
प्रताप कदम हे उमलते नेतृव असुन युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत.कुणाच्या मदतीला सहज उपलब्ध होणारे आणि सामाजिक कार्यात सर्वात पुढे असणारे नेतृव म्हणून प्रताप कदम यांची ओळख आहे.आगामी नगर पालीका निवडणुकीत प्रताप कदम यांच्यारुपाने राष्ट्रवादीला मोठे नेतृव व आधार मिळाला आहे.कदम यांच्या प्रवेशामुळे अन्य पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!