झरी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी,रब्बीची पिके आडवी

0 135

अनिल जोशी
झरी,दि 09 :
अतिवृष्टीमुळे  खरीप पीक हातचे गेले, शेतकऱ्यांना आता सर्व आशा रबी हंगामावर असताना शनिवारी(दि 08) मध्यरात्री एक ते दीड तास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कापलेल्या तुरीला अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तोंडचा घास निसर्ग हिरावून घेत असल्यामुळे कसा जगायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे काल रात्री एक ते दीड च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह परिसरात एक ते दीड तास बेसुमार पाऊस झाल्यामुळे  ज्वारी हरभरा गहू पिके आडवी झाली आहेत.  कापलेल्या तुरीला या पावसामुळे कोंब फुटायची वेळ आली आहे निसर्ग एक प्रकारचा शेतकऱ्याचा अंत पहात असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे
एकीकडे शेतकऱ्याचे लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी परेशान असताना त्यातच निसर्गाचा शेतकऱ्याचा अंत पाहू लागला आहे रात्री एक ते दीड तास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे परिसरात तुरीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे सद्यस्थितीला तुरीचे पीक कापून टाकल्यामुळे जमिनीवर आडवे असलेल्या पिकांना या पावसामुळे बाधा निर्माण झाले आहे.
हा पाऊस झरी सह मिर्झापूर साडेगाव संबर सावंगी जलालपूर मांडवा डिग्रस पिंपळा नांदापूर आदी गावांना असल्यामुळे सदरील गावाला तुरीचा फटका बसला आहे
पावसामुळे रात्रभर विद्युत पुरवठा खंडित.
सदरील पावसामुळे रात्रभर झरी सर्व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला झरी सह 33 केव्ही दुधगाव 33 केव्ही बोबडे टाकळी केव्ही,कुंभकर्ण टाकळी यात तीन फिटर वरील 56 गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून वृत्त लिहीपर्यंत कुंभकर्णाच्या झोपेत असलेले महावितरणला कर्मचाऱ्याला कुठलीही जाग आली नव्हती हे विशेष.

error: Content is protected !!