मराठी भाषेचे संवर्धन हिच काळाची खरी गरज-न्यायाधीश मंदार राऊत यांचे प्रतिपादन

0 42

 

सेलू, प्रतिनिधी – मराठी ही आपली राजभाषा असुन ती अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी तिचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सेलू दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मंदार राऊत यांनी येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात सेलू तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक व मराठी भाषा संवर्धन शिबिरा निमित्य मार्गदर्शन केले.

 

 

या वेळी व्यासपीठावर सेलू तालुका वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ उमेश खारकर,प्रमुख उपस्थिती केशवराज बाबासाहेब विदयालयाच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर,प्रमुख वक्ते सहशिक्षक तथा लेखक योगेश ढवारे,ज्येष्ठ विधिज्ञ टी.ए चव्हाण,डी.एम कुलकर्णी,जयंत डंख, गिरीश साडेगावकर, कृष्णा शेरे व महेश वाडेकरआदींची उपस्थिती होती.

 

 

या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,मराठी भाषा टिकवण्यासाठी,वाढवण्यासाठी वाचन संस्कृती विकसित होणे गरजेचे आहे त्यासाठी या तंत्रज्ञान समृद्ध युगात वाचन करणे क्रमप्राप्त आहे तरच आपण भाषा प्रगल्भ होऊ यासाठी आपण वाचन वाढवण्याचा संकल्प करूया असे ते म्हणाले.

 

 

या प्रसंगी मराठी भाषा संवर्धन मार्गदर्शन शिबीर प्रमुख वक्ते योगेश ढवारे यांनी मराठी भाषेचा उगम,रूपांतर,प्राचीन काळातील मराठी,मराठी भाषेची सद्यस्थिती व मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी करावयाचे सूत्रबद्ध नियोजन यावर सखोल मार्गदर्शन केले.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्षसंघाचे ॲड.उमेश खारकर यांनी केले सूत्रसंचालन ॲड.एम.ए वाडेकर,तर आभार ॲड.कृष्णा शेरे यांनी मानले.

 

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेलु वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य तालुका विधी सेवा प्राधिकरण चे वरिष्ठ लिपिक जी.व्ही कदम व शिपाई एस.एस गिरी व विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!