सातारच्या कन्या अलका देशमुख यांना राष्ट्रपती पदक जाहीर

0 500

1992 बॅच च्या पोलिस उपनिरीक्षक अलका सदाशिव देशमुख यांना पोलीस विभागातील गुणवत्तापूर्ण कामासाठी राष्ट्रपती 2022-23 वर्षासाठीचे पदक जाहीर झाले असून महाराष्ट्रातून या वर्षी सदर पुरस्कार नामांकन होणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत . श्रीम.देशमुख या सध्या गुन्हे कार्यप्रणाली शाखा ठाणे शहर येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत ,तीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांना आजवर एकशे तीस हून अधिक बक्षिसे मिळाली आहेत . मुलींची अपहरणातून सुटका , बनावट पासपोर्ट प्रकरणे उघडकीस आणणे , एअरफोर्स सेक्युरिटी, लाचलुचपत प्रतिबंधक अशा विविध विभागात व प्रकरणात त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे . 2004 या वर्षी त्यांना सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो कडून बेस्ट ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार तसेच 1 मे 2022 रोजी त्यांना पोलिस विभागातील सर्वोच्च पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देखील प्राप्त झालेले आहे .
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी महाराष्ट्राला एकूण 74 पदके जाहीर झाली आहेत यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत

error: Content is protected !!