प्राचार्य डॉ.आत्माराम टेंगसे अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याचे आयोजन

गंगाखेड येथे १६ जूनला आयोजन; 'दीपस्तंभ' गौरवग्रंथाचे विमोचन होणार

0 42

 

गंगाखेड येथील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे यांनी दिनांक ९ जून रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन कृतज्ञता सोहळा आणि त्यांच्या जीवनावर आधारित ‘दीपस्तंभ’ गौरवग्रंथाचे प्रकाशन रविवार (दि.१६) रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड येथील परळी रोड वरील साई वृंदावन लॉन्स मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
प्राचार्य डॉ. टेंगसे यांनी मराठवाड्यात शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. २३ वर्षाहून अधिक काळ प्राचार्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक आदी पदांवर यशवीरित्या काम करून पदाची गरिमा वाढवली आहे. त्यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून माजी विद्यार्थी संघटना, प्राचार्य डॉ.आत्माराम टेंगसे गुणगौरव समिती तसेच टेंगसे कुटूंबियांच्या वतीने विविध मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.
यावेळी सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.आत्माराम टेंगसे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य प्राचार्य डॉ. बी. एस. सोळंके हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजित भालेराव, शिक्षक आमदार विक्रम काळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे, भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, डॉ.सिद्धार्थ भालेराव, राजेश विटेकर, बाळकाका चौधरी, व्यंकटराव कदम, रामप्रभु मुंढे, माजी कुलगुरू डॉ.मधुकर गायकवाड,माजी कुलगुरू डॉ.एन. व्ही.कल्याणकर,परमेश्वर कदम,विजयकुमार तापडीया, माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.आत्माराम टेंगसे गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!