उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “मुंबईचा मोरया” स्पर्धेचं बक्षीस वितरण

0 14

 

गुरुदत्त वाकदेकर
मुंबई,दि 21 ः
मुंबई भाजपा यांच्या वतीने अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने, ‘मुंबईचा मोरया गणेशोत्सव स्पर्धा २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मुंबईतील एक हजारपेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ६.०० वाजता शिवाजी मंदिर, दादर, येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शीव प्रकाश, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, विधानपरिषद गटनेते तसेच या स्पर्धेचे संयोजक मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर, संचालक आ. प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी भाजपा मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, भाजपा मुंबई कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनौबत तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या सोहळ्या प्रसंगी जीवनगाणी निर्मित, “नवा श्रीगणेशा एक संगीत नृत्य सोहळा” ह्या कार्यक्रमातून अनेक नामवंत कलाकारांनी आपले योगदान, कौशल्य, कलात्मकता सादर करताना उपस्थित कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा दिली.

या स्पर्धेचे विजेते ठरविण्यासाठी ३० तज्ञांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम फेरीत ६७ मंडळ पात्र झाले. त्यापैकी २१ मंडळाची विजेते म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या सहा विभागातून समप्रमाणात मुर्तीची सुबकता, सजावट, स्वच्छता आणि सामाजिक संदेश या निकषांवर निष्पक्ष निर्णय घेऊन स्पर्धा समितीने २१ विजेत्यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे स्पर्धेच्या ५०० रुपये प्रवेश शुल्कातून जमा झालेले ५ लाख १३ हजार रुपये हे पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहेत.

पारितोषिक प्राप्त मंडळ:-
विभाग – सर्वोत्कृष्ट मूर्ती – प्रथम क्रमांक श्री लक्ष्मीनारायण बाल गणेश तरुण मंडळ, घाटकोपर (रु. तीन लाख व चषक), द्वितीय क्रमांक शरद मित्र मंडळ वर्सोवा (रु. दीड लाख व चषक), तृतीय क्रमांक फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोर्टचा इच्छापूर्ती गणेश (रु. पंचाहत्तर हजार व चषक)
विभाग – सर्वोत्कृष्ट सजावट व देखावा – प्रथम क्रमांक नवतरुण मित्र मंडळ, मागाठणे (रु. तीन लाख व चषक ) द्वितीय क्रमांक ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव (रु. दिड लाख व चषक), तृतीय क्रमांक श्री गणेश क्रिडा मंडळ, अंधेरी (पूर्व) (रु. पंचाहत्तर हजार व चषक)
विभाग – सर्वोत्कृष्ट स्वच्छता परिसर व सामाजिक कार्य – प्रथम क्रमांक पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना. म. जोशी मार्ग (रु. तीन लाख व चषक), द्वितीय क्रमांक पिंपळेश्वर मित्र मंडळ, वाळकेश्वर (रु. दिड लाख व चषक), तृतीय क्रमांक चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी (रु. पंचाहत्तर हजार व चषक)
उत्तेजनार्थ पारितोषिक (रूपये ११ हजार व प्रमाणपत्र) शांतीनगर रहिवाशी संघ मुलुंड (प.), बांद्रेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जोगेश्वरी (पू.), बाळगोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव, विलेपार्ले, सराफ चौधरी नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांदीवली (पू), साई गणेश वेलफेअर असोसिएशन, बोरीवली (प.), महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ, चेंबूर, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, सिद्धीविनायक सभागृह विक्रोळी (पू.), ग . द . आंबेकर मार्ग (काळेवाडी), सार्वजनिक उत्सव मंडळ, शिवडी, बाल मित्र मंडळ सार्वजनिक उत्सव मंडळ बोलेवाडी, दादर, युवा मित्र मंडळ, वांद्रे, खेरनगर गणेशोत्सव मंडळ, वांद्रे (प), बेलासीस रोड, बी आय टी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई सेंट्रल

error: Content is protected !!