सेलूत राज्यस्तरीय रागोंळी स्पर्धेचे बक्षिस वाटप

0 110

 सेलू,दि 13 (प्रतिनिधी)ः
शिवगर्जना मिञमंडळ सेलुच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.!या कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब जिजाऊ साहेबांना दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करुन जिजाऊ वंदना करुन सुरुवात केली..या रांगोळी स्पर्धेमध्ये 87 स्पर्धकांनी सहभाग नोंदवुन आपापली रांगोळी काढुन कला दाखवुन दिली.
त्यामध्ये प्रथम क्र. कैलाश सुभाषराव राखोंडे परभणी, द्वितीय  पाठक संतोष अशोक, तृतीय विभागुन देण्यात आला  रितल महाजन (मालेगाव साई आर्ट) व उईके ज्योति सत्यपाल औरंगाबाद, उतेजनार्थ सुदेशना कच्छवे व जान्हवी नंदकिशोर खंडागळे यांनी पटकावला.यावेळी प्रमुख म्हणुन सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर,माजी सभापती अशोक काकडे, किशोर कटारे कलाशिक्षकचे बर्वे , सविता साडेगावकर, निर्मला लिपणे, निर्मला पदमावत, आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आबा खंडागळे, गुलाब खेडेकर, अशोक शेलार, जयसिंह शेळके, संभाजी रोडगे, दिऩेश गाडेकर, अरुण ताठे, अनिल रोडगे, मंजुषा बोराडे, अमृता कदम,ङू सोमनाथ सिरसाट, बालाजी सिरसाट, डीगांबर लहाने, कृष्णा तिडके, रितेश सरोदे आदिंनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!