लैझीम पथक व ढोल ताश्यांच्या गजरात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची मिरवणुक

0 71

 

 

सेलू, प्रतिनिधी – बाराव्या शतकात अंधश्रद्धा व स्त्री पुरुष असमानतेला मुठमाती देऊन धर्मसुधारणेसाठी महात्मा बसवेश्वरांचे कार्य विरशैव समाजबांधवांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची सेलू शहरात रवीवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सेलू येथील शंकरलिंग मंदिर येथून रवीवारी दुपारी ५:३० वा.कैलास स्वामी ,पशुपती स्वामी यांचे उपस्थितीत शिवहर शिवणकर यांचे हस्ते ट्रँक्टरवर बसविण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पुजन करून मिरवणूकीला आरंभ झाला.मारवाडी गल्ली,मठ चौक,जवाहर रोड,क्रांती चौक,टिळक पुतळा,गणपती गल्ली,नावाडे गल्ली ,सुरज मोहल्ला या मार्गावर लैझीम पथक,ढोल ताशाचे वाद्य व बसवेश्वर किर्तीची विज कडाडली..अशा गाण्याच्या आवाजावर विरशैव महिला व पुरूषांनी चांगलाच ठेका धरला होता. ४ तास चाललेल्या मिरवणूकीत ठिकठिकाणी फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली तर शहरातील व्यापारी व समाज बांधवांनी थंड पाणी व शरबत याचे वाटप केले.या दरम्यान माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,माजी नगरसेवक विनोद तरटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साईराज बोराडे,राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष रघुनाथ बागल,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके व आर्जुन बोरूळ,प्रविण क्षिरसागर यांनी बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले.बंदोबस्तात पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड व पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती.या मिरवणुकीची सांगता शंकरलिंग मंदीरात सागर अगजाळ यांचे हस्ते आरती ने करण्यात आली. यानंतर संयोजन समीतीकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते.

संयोजन समितीमध्ये राजेंद्रअप्पा महाजन,अशोकअप्पा वाडकर,विनोद तरटे,अँड गिरीष साडेगावकर,गणेशअप्पा नाईकवाडे ,महादेव अगजाळ, रेवणअप्पा साळेगावकर,अँड अनिल तोडकर,शुभंम महाराज, अँड.श्याम राऊत,विश्वनाथ होगे,प्रकाश साखरे,पवन मिटकरी,बालू झमकडे, पवन कामठे, मिलींद झमकडे, ऋषीकेश झमकडे, मिकटरी,उत्तरेश्वर साडेगावकर,सोनू राऊत,शुभंम नवघरे,ओंकार महाजन, मल्लीकार्जुन भोगावकर यांनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!