शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी हिंगणघाटला निषेध मोर्चा

0 72

 

हिंगणघाट,दि 11 (प्रतिनिधीः
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांच्या निवास्थानी करण्यात आलेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी आज मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. या निवेदनातून प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणातील मास्टर माईंड दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.शरद पवार  यांच्या “सिल्वर ओक” मुंबई येथील निवासस्थानी काही समाजकंटकांनी घोषणा देत चप्पल व दगडफेक करून लोकशाही कृत्याला हरताळ फासण्याचे निंदनीय कृत्य केलेले आहे हा प्रकार अतिशय भयंकर आणि निषेधार्ह आहे.

पवार हे देशाचे सुसंस्कृत नेते असून सर्वव्यापी असे त्यांचे नेतृत्व आहे लोकशाही वर विश्वास ठेवणारे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत असून या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ राऊत,कृषी उत्पन्न बाजार समिती हि.सभापती सुधीरबाबू कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुलभाऊ वांदिले, विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, हि.तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, हि.शहर अध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, समुद्रपूर ता.अध्यक्ष महेश झोटिंग, समुद्रपूर सभापती हिम्मत चतुर,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, नगरसेवक धनंजय बकाने,अमोल बोरकर, किशोर चांभारे, धनराज कुंभारे, सुनील भुते, प्रा.दिनकर घोरपडे,राजेश धनरेल, बालाजी गहलोद, अनिल भोंगाडे, तेजस तडस, विकी वाघमारे, पंकज पाके, प्रशांत लोणकर, संजय चौहान, श्रीकृष्ण मेश्राम, नितेश नवरखेडे, सतिष खोंडे, विनोद वांदिले, कैलास भोयर, बळीराम नासर, गणेश वैरागडे, दिगंबर चांभारे, प्रवीण काळे, हरीश काळे, नितीन भुते, प्रशांत एकोणकर, राजू कटारे, महादेव बाधले, किशोर भजभूजे, परम बावणे, महेश मुडे, बच्चू कलोडे, उमेश नेवारे, अमोल मुडे, कवडू मुडे,माणिक लांडगे,गुणवता कुंभारे, राजकुमार जवादे,बालु बोरेकार, गजानन मुंगले, सुरेंद्र टेभुरने,पंकज झांबरे, प्रवीण गुरमुले,रितेश कळपाते, शुभम जुमनाके, विवेक कांबळे, संजय कात्रे,सुरेकांत तिजारे, सुधाकर डभारे,गोकुळ ढगे, राजू देवतळे,विजय तामगाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देते वेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!