गोदाकाठसाठी रुग्णवाहिका द्या, खंडू बोडके-पाटील यांची जिप अध्यक्षांकडे मागणी

0 29

निफाड,दि 02 (प्रतिनिधी)ः
गोदाकाठच्या नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी म्हाळसाकोरे आरोग्य केंद्राला अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी जि.प अध्यक्ष बाळासाहेब(आप्पा) क्षीरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गुरुवारी जिल्हा परिषदेत अध्यक्ष दालनात बाळासाहेब क्षीरसागर यांची शिष्टमंडळासह भेट घेत रुग्णवाहिकेसह गोदाकाठच्या आरोग्याबाबतच्या समस्यांबद्दल खंडू बोडके-पाटील यांनी चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी साहेब, जि.प सदस्या सौ.जाधव, जि.प सदस्य दीपक शिरसाठ, पंचायत समिती सदस्य शहाजी पाटील राजोळे, शिवा पाटील सुरासे, जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पावशे, सागर जाधव, अनिल जोगदंड आदी उपस्थित होते. रुग्णवाहिकेबद्दल तातडीने सकारात्मक निर्देश यावेळी जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना दिले. गोदाकाठमध्ये कोविड लसीकरनाला गती देण्याची विनंतीही खंडू बोडके पाटील यांनी यावेळी केली.

 

error: Content is protected !!