कोलदांडा कथासंग्रहाचे प्रकाशन

0 32

 

पूर्णा, सुशिलकुमार दळवी – शहरातील कवी लेखक दिपक पुर्णेकर लिखित कोल दांडा या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी पूर्णा शहरातील गोंधळसम्राट राजारामबापू सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला पडला पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीनजी चंदनशिवे हे होते.

 

 

उद्घाटक म्हणून माजी नगरसेवक संतोष एकलारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष दादाराव पंडित व स्वागताध्यक्ष विनोदभाऊ गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती. तसेच सामाजिक कार्यकर्ते मास्टर अनिल कांबळे,प्रा.घोडे सर, बंडु गायकवाड, विजय गायकवाड,शिवा देवणे,विजय सातोरे,,रौफ सर, मिलींद सोनकांबळे,संजय शिंदे,रवि गायकवाड, तुषार गायकवाड,अनिल नरवाडे आदींची प्रमुख उपस्थितीही होती.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोलदांडा कथासंग्रहाचे लेखक दिपक पुर्णेकर यांनी केले. तर शुभेच्छापर भाषणामध्ये उद्घाटक संतोष एकलारे, दादाराव पंडित, मास्टर अनिल कांबळे, विनोदभाऊ गायकवाड , यांनी आपले मत व्यक्त करून कोलदांडा कथा संग्रहास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये विद्रोही कवी दंगलकार नितीनजी चंदनशिवे यांनी सखोल असे मार्गदर्शन करून त्यांच्या काही कवितांचे सादरीकरण केले.

 

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीनजी नरवाडे यांनी केले. नागसेन जमधाडे, आकाश गायकवाड, श्याम खंदारे, उमाकांत गायकवाड, सुमित चावरे, आदींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी शहरातील बहुसंख्य साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!