लासलगांव बाजार समितीत 3 लाख 51 हजारात बैल जोडीची खरेदी-सौ. सुवर्णा जगताप

0 62

 

 

 

 

निफाड, रामभाऊ आवारे – लासलगांव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर रू. 3 लाख 51 हजारात बैलजोडीची खरेदी झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली.

 

कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव ह्या बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर दर रविवारी बैल, गाय, शेळी, मेंढी व बोकड इ. जनावरांचा आठवडे बाजार भरतो. सदर आठवडे बाजारात रविवार, दि. 04 सप्टेंबर, 2022 रोजी ओतुर, ता. कळवण येथील शेतकरी अशोक पंडीत मोरे यांनी रू. 3 लाख 51 हजार या विक्रमी किंमतीत बैल व्यापारी हरी वेळंजकर यांचेकडुन बैलजोडीची खरेदी केली. त्यानिमित्त सदर बैलजोडीचा गुलाल उधळुन व वाद्य वाजवुन मिरवणुक काढण्यात आली. याप्रसंगी संबंधित शेतकरी व व्यापारी यांचा बाजार समितीच्या वतीने सचिव नरेंद्र वाढवणे यांनी शाल, हार व नारळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुनिल डचके, जनावरे बाजार इनचार्ज अशोक गायकवाड, लासलगांव येथील वैद्यकीय अधिकारी मोटेगांवकर, गणेश आहेर, अरूण ठाकरे, व्यापारी दादाजी व्हलगडे, पांडुरंग व्हलगडे, बबन बिरार, रविंद्र जाधव, लक्ष्मण सुरासे, नवनाथ काळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!