असानी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

0 133

हवामान विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून असानी चक्रीवादळाबाबतच्या आठवड्यापासून राज्यातील पुण्यासह इतर राज्यात उष्णतेची लाट असं संमिश्र वातावरण गेल्या आठवड्यात बघायला मिळालं. त्यानंतर आज दिवसभरात पुण्यासह अन्य जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने पुणे शहरात मंगळवार आणि बुधवारी हलक्या तीव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, कोल्हापूरसह कोकणात पावसाचा अंदाज वर्तवला  आहे.

मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात सकाळच्या वेळेत तीव्र उष्णता जाणवत होती. ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही कोणत्याही जिल्ह्यात अद्याप पाऊस पडलेला नाही.
गेल्या दोन दिवसांत पुण्याच्या कमाल तापमानामध्ये बदल झाला आहे. या महिन्यात पहिल्यांदाच 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पुण्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर दिसून आला नाही. दुसरीकडे, महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
10 ते 13 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर 13 मे रोजी पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 11 ते 13 मे दरम्यान मुंबई, परभणी, कोल्हापूर आणि सातारा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटांपासून 270 किलोमीटर, पोर्टब्लेअरपासून 450 किमी, तर आंध्रप्रदेश आणि पुरीपासून 610 किमी अंतरावर खोल समुद्रात आहे. मंगळवारी (दि.10) हे चक्रीवादळ उत्तर आंध्रप्रदेश आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर पोहोचणार आहे.
सध्या या चक्रीवादळाचा वेग ताशी 80 ते 90 किमी असून मंगळवारी हा वेग ताशी 100ते 120 किमी इतका वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात पुणे शहरात आर्द्रता पातळी 50 ते 65 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असे IMD अधिकाऱ्यांनी सांगितले.

error: Content is protected !!