राष्ट्रीय युवा शक्ती “संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी रामभाऊ आवारे यांची निवड–

0 25

निफाड,दि 16 (प्रतिनिधी)ः
संत चरित्र ग्रुप महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सरचिटणीस तथा स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच दैनिक शब्दराज निफाड प्रतिनिधी रामभाऊ विठ्ठलराव आवारे सर (वनसगाव) यांची “राष्ट्रीय युवा शक्ति” संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून जिल्ह्यातून व राज्यातून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
युवा वर्गातील देशभक्ती,आत्मनिर्भरता व संस्कार, स्वावलंबन आणि उच्च मूल्ये देण्याचा निर्धार राष्ट्रीय युवा शक्ती संघटना (नवी दिल्ली) करते. या संघटनेचे अध्यक्ष राघवेंद्र पांडे, राष्ट्रीय सरचिटणीस नवीनकुमार मिश्रा, महिला प्रभारी अध्यक्ष माधुरी गुजराती यांच्या संमतीने व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विलास गायकवाड यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील नवीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये नाशिक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून रामभाऊ आवारे सर यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. रामभाऊ आवारे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युथ राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राघवेंद्रजी पांडे, राष्ट्रीय सरचिटणीस नवीनकुमार मिश्रा, महिला प्रभारी अध्यक्ष माधुरी गुजराती, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर ,प्रदेश कार्याध्यक्ष सुनीलसिंह परदेशी ,प्रदेश उपाध्यक्ष श्रीनिवास पिडियार, विलास गायकवाड यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांनी या निवडीला सहमती दर्शवत आनंद व्यक्त केला. अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले व अनेक दैनिक वृत्तपत्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी म्हणून काम करणारे पत्रकार रामभाऊ आवारे यांच्या निवडीबद्दल
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णाताई जगताप, जि प सदस्य डि के नाना जगताप,
देवमामलेदार यशवंत महाराज ट्रस्ट अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड, नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा, गणेश बँकेचे संचालक उन्मेष डुंबरे, संतचरीत्र गृप मार्गदर्शक भागवतानुरागी कविताताई साबळे,हभप वाल्मीक महाराज जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!