परभणी, दि. ३ (- सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. मोहिमेअंतर्गत परभणी तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील (PHM) रेशनकार्डवर नौद असलेल्या प्रत्येक सदस्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शासनाने दिलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास, रेशन तात्पुरत्या स्वरुपात बंद अथवा रेशन कार्ड फ्रिज होऊ शकते व त्यामुळे भविष्यात मिळणारे धान्य वितरण खंडित होण्याची शक्यता आहे. रेशन सुरळीत सुरु ठेवण्यासाठी खालील २ पद्धतींपैकी एका पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन परभणीचे तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केले आहे
ई-केवायसी (e-KYC) करण्याच्या २ पद्धतीः
१. ऑनलाईन पदधत (घरबसल्या मोबाईलवरून): (टीपः यासाठी तुमचा आधार नंबर रेशन कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे).
सर्वात आधी Google Play Store वरया Aadhaar FaceRD आणि Mera eKYC हे दोन अॅप्स इन्स्टॉल करा. Mera eKYC अॅप ओपन करा आणि तुमचे Residential State (सध्या राहण्याचे राज्य) व Home State (मूळ राज्य) निवडून Proceed करा. तुमचा आधार नंबर टाका आणि Generate OTP वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP व कॅप्चा टाकून Submit करा.
स्क्रीनवर माहिती दिसेल; तिथे Face eKYC पर्यायावर क्लिक करा. कॅमेरा ओपन झाल्यावर तुमचा चेहरा स्कॅन करा (स्कॅन करताना डोळ्यांची हालचाल करा). केवायसी यशस्वी झाल्यावर मेसेज येईल.
२. ऑफलाईन पद्धत (रेशन दुकानात जाऊन मोफत):
प्रक्रीया कुठे करावीः लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या संबंधित रास्त भाव धान्य दुकानात (रेशन दुकान) जावे.
सोबत आणायची कागदपत्रेः सोबत आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.
बायोमेट्रिक पडताळणीः रेशन दुकानदार ई-पास (e-Pos) मशीनद्वारे स्वतःच्या अंगठ्याचा किंवा बोटांचा ठसा देऊन आधार ई-केवायसी विनामूल्य पूर्ण करून देईल.
सर्व सदस्यांची उपस्थितीः रेशनकार्डवर नाव असलेल्या लहान-मोठ्या सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष रेशन दुकानात जाणे
गरजेचे आहे.
ई-केवायसी झाली की नाही (Status) कसे तपासावे?
Mera Ration अॅपमध्ये लॉगिन करून तुमची केवायसी आधीच पूर्ण (Approved) दाखवत असेल, तर तुम्हाला पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही.
तपासण्याच्या स्टेप्सः वरील ऑनलाईन स्टेप्स फॉलो करा.
माहितीच्या शेवटी e-KYC Status समोर ‘Y’ लिहिलेले दिसल्यास तुमची केवायसी यशस्वी झाली आहे. (केवायसी मंजूर होण्यासाठी साधारण १.५ ते २ महिन्यांचा कालावधी लागू शकतो).
इतर महत्वाच्या सूचना :
मोबाईल सिडींग (मोबाईल नंबर रेशन कार्डशी जोडणे): शिधापत्रिकाधारकांता धान्याच्या वितरणाचे मेसेज (SMS), पावती आणि ऑनलाईन सेवांसाठी ओटीपी (OTP) वेळेवर मिळण्यासाठी रेशन कार्डला चालू मोबाईल क्रमांक लिंक (Seed) करणे अनिवार्य आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपला मोबाईल क्रमांक जोडलेला नाही किंवा ज्यांचा मोबाईल क्रमांक बदलला आहे, त्यांनी तात्काळ रेशन दुकानदाराकडे आऊन आपला नवीन मोबाईल नंबर अपडेट (सिडींग) करून घ्यावा,
आधार वायोमेट्रिक अपडेटः ज्या लाभार्थ्यांच्या हाताचे ठसे है-पास मशीनवर येत नाहीत किंवा ज्या लहान मुलांचे वय ५ व १५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आधार बायोमेट्रिक अपडेट झालेले नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे.
रास्त भाव दुकानदारांना निर्देशः परभणी तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांनी आपल्या दुकानाशी संलग्न सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी आणि मोबाईल सिडींगबावत योग्य माहिती देऊन १००% काम तेळेत पूर्ण करून घ्यावे,
तरी परभणी तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता तात्काळ आपली ई-केवायसी व मोबाईल सिडींग पूर्ण करावी आणि शासकीय योजनेचा विनाअडथळा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Shabdraj www.shabdraj.com