‘गौरव महाराष्ट्राचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने रज्जाक शेख सन्मानित

0 12
श्रीरामपूर – शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्रीक्षेत्र नेवासा जिल्हा अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती श्रीरामपूर येथील शिक्षण विभागातील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक तथा साहित्यिक रज्जाकभाई शेख  यांना “गौरव महाराष्ट्राचा  राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक” पुरस्काराने कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यकृषिभूषण पुरस्कर्ते ज्ञानेश्वर पवार , अशोक ढगे माजी कुलगुरू मराठवाडा विद्यापीठ, कडूभाऊ काळे संस्थापक नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्था, कामगार नेते कॉ.बाबा आरगडे,संजय वाघमारे अध्यक्ष शिवस्वराज्य   बहुउद्देशीय संस्था, सौ.रमाताई वाघमारे सचिव शिवस्वराज्य संस्था, ग्रामीण कवी आनंदा साळवे ,सोहम प्रकाशन संस्थेचे नितीन गायके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. 
 
 
 
मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,आणि मानाचा फेटा समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.कोरोना काळात कोरोना जनजागृती संदर्भात शासकीय जबाबदारी घेऊन रज्जाक शेख यांनी काम पाहिले.परराज्यातील रेल्वेने येणारे व जाणारे प्रवासी तपासणी पथकात त्यांनी बेलापूर रेल्वेस्टेशन येथे नाईट ड्युटी बजावली.गरजवंत रुग्णाला अचानक रक्ताची गरज पडू शकते या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत दोनदा स्वतः रक्तदान केले. आपल्या उत्तम लेखणीद्वारे राज्यातील विविध वर्तमानपत्रातून आपल्या तीस ते पस्तीस कवितांना प्रकाशित करून आरोग्य व कोरोना यांच्या भयंकरतेची कल्पना मांडली.’स्टडी एट होम’ ही संकल्पना राबवताना मुलांना दररोज व्हाट्सएपच्या माध्यमातून घरचा अभ्यास दिला.ज्या मुलांकडे मोबाईल उपलब्ध नाही त्यांना स्वाद्याय पुस्तिका झेरॉक्स करून घरोघरी जाऊन दिल्या आणि शिक्षण प्रक्रिया खंडित राहणार नाही याची दक्षता घेतली . 
 
 
 
मेसेजद्वारे ऑनलाईन टेस्ट ,ऑनलाईन अभ्यासाच्या पीडीएफ नित्यनेमाने पालकांपर्यंत पोहोचवल्या.शैक्षणिक विडिओच्या युट्युब लिंक, कवितांच्या लिंक व चित्र पाठवाचन लिंक ,स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांना दिल्या.कोरोना कालावधीत भर पावसाळ्यात शाळेत कोरोन्टाईन केलेल्या चाळीस मजुरांची तात्पुरत्या स्वरूपात पंधरा दिवसासाठी राहण्याची ,पाण्याची व विद्युत प्रकाशाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले. या कालावधीत शासनाकडून उपलब्ध शालेय पोषण आहार व मोफत पाठ्यपुस्तक  वाटपचे कार्य शंभर टक्के पूर्ण केले. तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात वाढती लोकसंख्या व त्याचे वातावरणातील ओझोनच्या थरावर होणारे परिणाम याविषयावर मॉडेल बनवून द्वितीय क्रमांक मिळवला. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व पदाधिकारी सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत सक्रिय भूमिका असलेल्या श्रीरामपूर गटाने तृतीय क्रमांक मिळवला. 
 
 
 
 
राज्यातील विविध वृत्तपत्रातून “खेळू करू शिकू” या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली.सध्या शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना मनोरंजक अशा राज्यभरातून गाजलेल्या नामवंत शंभर कवींच्या बालकविता एकत्र करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत ‘काव्यदरबार’ हा दिवाळी बालकाव्य विशेषांक उपलब्ध करून दिला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यांतर्फे शैक्षणिक कविसंमेलनात दोनदा काव्यसादरीकरणाची संधी मिळाली.ऑनलाइन विद्यार्थी स्वाध्याय ही संकल्पना अंमलबजावणी केली.भारताचा अमृत महोत्सव अभियानात तालुकास्तरावर गितगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.राज्यभरातील विविध वृत्तपत्रांमध्ये आपल्या बालकविता व शेतीमातीच्या कविता प्रकाशित केल्या.जीवन गौरव परिवारातर्फे समाजातील मजूर,वंचित दुर्बल घटकातील,अल्पसंख्याक समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरण केल्या.ह्या सर्व कार्याची दखल घेऊन हा महत्वाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!