एस.टी संघटनेची मान्यता रद्द

0 172

 

वृत्तसेवा, गजानन जोशी – संघटनांना गंगेत सोडून आंदोलनाचं रणशिंग फुंकणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा कोर्टातून मोठा विजय झालाय. एसटी महामंडळातील एकमेव मान्यता प्राप्त संघटनेची मान्यताही औद्योगिक न्यायालयानं रद्द केलीय. वेतन करार करताना महाराष्ट्र एसटी वर्कर्स कामगार संघटनेनं कामगारांचे हित जोपासले नसल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने हा निकाल दिलाय. निर्णायक लढ्यासाठी मैदानात उतरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. सरकार धार्जिन्या संघटनांच्या बेडीतून मुक्तता करा ही कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी न्यायालयातून मान्य झालीय. आधी कामगार संघटनेला सोडून गेले, आता मान्यताही गेल्याने संघटनेवर कायमचा गाशा गुंडाळण्याची आणि फक्त कोऱ्या पावत्या फाडण्याची वेळ आल्याचं बोललं जातंय.

error: Content is protected !!