डेप्युटी सीईओ मंजुषा कापसे यांच्या उपस्थितीत अहवाल वाचन

0 80

परभणी,दि 21 
शुक्रवार दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी विभागीय आयुक्त यांच्या तपासणी मुद्द्यांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मंजुषा जाधव (कापसे) यांनी गंगाखेड पंचायत समिती येथे अहवाल वाचन केले.

तपासणी दरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटींची भविष्यात पुनरावृत्ती होणार नाही याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
त्याचबरोबर या बैठकीत सुंदर माझे कार्यालय, ई- प्रशासन बाबत प्रभावी अंमलबजावणी व्हावी याबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गंगाखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा परिषदेतील अधिकारी उमेश गायकवाड, कमलाकर साळवी, विलास चौधरी, दत्ता कदम, पुरणवाड यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!