हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर जवादेचा देहदानाचा संकल्प

0 32

 हिंगणघाट,दि 16 (प्रतिनिधी):- स्वामी विवेकानंद चौक येथील क्राँप्ट व्यवसायीक ज्ञानेश्वर जवादे, यांनी आपल्या मरणोपरांत कोणत्याही कर्मकांडात न पडता आपल्या देहाचे दान नवीन डाँक्टर तयार होण्यासाठी करण्याचा परिवारातील सर्व सदस्यांची परवानगी घेत महात्मा गांधी मेडिकल काँलेज, कस्तुरबा हाँस्पिटल, सेवाग्राम येथे देहदान विभागाचे प्रमुख डॉ. जे.ई. वाघमारे, तथा न्याय वैद्यकीय तज्ञ डॉ. इंद्रजीत खांडेकर, भारतीय युवा संस्कार परिषदेचे संस्थापक प्रदीपकुमार नागपुरकर यांचे उपस्थित ज्ञानेश्वर जवादे यांना देहदानी संकल्प प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यावेळी जवादे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की भगवान गौतम बुद्ध म्हणायचे की मरतात सर्वे मरणे मलाही तनूचा हा सर्व दुरगंध आहे तेव्हा हा तनू म्हणजे शरीराचा उपयोग मरण्यानंतरही कुण्या चांगल्या कामासाठी झाला पाहिजे हा विचार डोक्यात घेऊन मी माझ्या शरिराचा देहदान करुन विद्यार्थ्यांना मानवी शरिराचे तंत्रज्ञान डाँक्टर होण्यासाठी उपयोगी यावे हा मानस ठेऊन हा मानवी देह झिजावा मानव उत्थानासाठी हा त्यांचा मानस होता. देहदान करण्याचे त्यांचे धाडसी निर्णाया बद्दल युवक माजी आमदार राजू तिमांडे,बिरादरी चे अशोक सोरटे, भारतीय युवा संस्कार परिषदेचे केन्द्रियध्यक्ष डॉ.प्रा.शरद कुहीकर, युथ वेलफेअर चे सत्यशील रेवतकर, त्याचे मुले प्रदीप, अभय जवादे, मुली, जावई, आप्तस्वकीय यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!