कृषि विद्यापीठात मॉर्निग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांवरील निर्बंध हटविले;सकाळी वाहनांना मात्र बंदी

0 39

परभणी/प्रतिनिधी
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी काही दिवसांपासून घालण्यात आलेले निर्बंध विद्यापीठ प्रशासनान हटविले असून याबाबत सोमवारी (दि.9) कुलसचिव संतोष वेणीकर यांनी याबाबत पत्र काढले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, वनामकृविच्या परिसरात सकाळी फिरण्यास येण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही बंदी घातली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापाठात सकाळी फिरण्यास, व्यायामासाठी येणा-या जनतेची नोंद ठेवण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने भविष्यात ओळखपत्राची तरतूद करण्यात आली आहे. यापुढे विद्यापीठात फिरण्यास येणा-या महिला, वयस्कर नागरिक, लहान मुलांची सुरक्षा ठेवणे सोईचे होईल. पहाटे 5 ते सकाळी 8 वाजेपर्यंत विद्यापीठात प्रवेश करणा-या वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे, जेणेकरून फिरण्यास येणा-या नागरिकांना त्रास होणार नाही. विद्यापीठ परिसरात फिरण्यास विद्यापीठ प्रशासनाने बंदी घातली आहे अशा अफवांवर परभणीकरांनी विश्वास ठेवू नये. विद्यापीठ परिसरात फिरण्यास येणारे सर्व नागरीक हे विद्यापीठाचे स्वयंसेवक असून आपण विद्यापीठाचे स्वच्छतादूत आहात यात शंका नाही. म्हणून आपण विद्यापीठ परिसराचे रक्षण कराल व विद्यापीठ परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत कराल अशी अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाला आहे, असेही कुलसचिव वेणीकर यांनी नमूद केले आहे.

error: Content is protected !!