संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या अध्यक्षपदी सचिन काळभोर यांची फेरनिवड तर सचिव पदी सौ.लीना आढाव यांची वर्णी

0 57

खडकवासला, प्रतिनिधी – काल कोजागिरीचं औचित्य साधून १९ आँक्टोबर २०२१ रोजी संस्कार भारतीची सर्वसाधारण सभा निगडी येथील सावरकर सदन या ठिकाणी पार पडली.यात सौ. लिना आढाव यांनी समितीच्या नविन सचिव म्हणून पदभार स्विकारला तर अध्यक्ष सचिन काळभोर व खजिनदार कु सायली देवधर यांची पुनर्निवड झाली आहे.तर माजी सचिव हर्षद कुलकर्णी यांना उपाध्यक्ष जबाबदारी मिळाली. आहे.सहसचिव पदाची जबाबदारी सतिश वर्तक यांना देण्यात आली आहे. प्रसिद्धी प्रमुखांची जबाबदारी चैतन्य कुलकर्णी व तांत्रिक तज्ञ म्हणुन नेहा दाते यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला पश्चिम प्रांताचे महामंत्री सतिश कुलकर्णी, सौ. विनिता देशपांडे, सौ. विशाखा कुलकर्णी हे उपस्थित होते.विविध विधांचे प्रमुख व सहप्रमुखांची निवड या दरम्यान करण्यात आली, विधा व विधा प्रमुख/सहप्रमुखांच्या नियुक्ती पुढील प्रमाणे.नृत्य-सौ.वरदा वैशंपायन,सौ.स्नेहल सोमण,सौ.अनुजा वैशंपायन,नाट्य-किरण येवलेकर,अमेय देशपांडे,प्रसन्न कुलकर्णी साहित्य-सौ.प्रणिता बोबडे,सौ.शुभदा दामले,सौ.प्रिया जोग.चित्रकला-प्रफुल्ल भिष्णूरकर,सौ.वर्षा अर्धापुरकर ,चिन्मय बहूलेकर.संगीत-सौ.स्वरेषा कुलकर्णी,सौ.पल्लवी ठाकरे,सौ.शर्मिला निलेश शिंदे प्राचिन कला ऐतिहासिक वास्तू- शुभम दौंड.रांगोळी- सौ.गौरी कारंडे / सौ.अनिता रोकडे सौ प्राजक्ता काळभोर.बालांसाठी उपक्रम व नृत्य मासिक सभा – सौ. सायली काणे.इतर विविध उपक्रम :- नरेंद्र आमले,सौ सुवर्ण बाग,सुहास जोशी.

को-जागरतीचे औचित्य साधून झालेल्या बैठकीत प.प्रांत महामंत्री सतिशजी कुलकर्णी यांनी सर्वांशी साधलेला उद्बोधक संवाद संस्कारभारती पिं चिं समितीच्या सर्व कार्यकर्त्यांकरिता खऱ्या अर्थी नव विचारांचा दिशादर्शक जागर होता.
सद्विचार,सतर्कता,व सामाजिक जाणिव ही कलेच्या माध्यमातून समाजात रुजवता येते व त्यासाठी संस्कारभारती हे एक सक्षम व्यासपीठ आहे याची जाणीव सर्वाना कार्यकर्त्यांना झाली. नवनिर्वाचित कार्यकारिणीतील सर्वांचे अभिनंदन करून महामंत्री सतीशजी कुलकर्णी यांनी दायित्व घेताना संस्कार भारतीच्या विचारधारेनुसार कार्य करावे असे संबोधन केले. सदरच्या सर्व साधारण सभेच्या समारोपावेळी सचिव सौ. लीना ताई आढाव यांनी आभार मानले.

error: Content is protected !!