सेलूत राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉलचे स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर

0 37

सेलु,दि 04 (प्रतिनिधी)ः
मारप्पा (तामीळनाडू)येथे ता. ७ ते ९ आक्टोबर या कालावधीत संपन्न होणारया २४ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षण शिबीर सेलू येथे संपन्न झाले .या शिबिराचे उदघाटन नूतन चे संस्थाध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी,माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे मुख्याध्यापक नारायण सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन,परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबीरात महाराष्ट्र राज्याच्या टेनिस व्हॉलीबॉल संघातील मुंबई, सोलापूर, बीड, यवतमाळ, अकोला, बुलढाणा,हिंगोली, परभणी, जिल्ह्यातील २८ खेळाडूंचा समावेश आहे.
सदरील संघातील खेळाडू सेलू नूतन विद्यालय दि. ३ ते ४ ऑक्टोबर दोन दिवशीय राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर घेऊन २४ वी. राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा मारप्पा (तामिळनाडू) दि. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कार्यक्रम चे प्रास्ताविक राज्य सचिव गणेश माळवे तर सुञसंचलन डॉ. काशीनाथ पल्लेवाड यांनी केले . जिल्हा सचिव सतीश नावाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले ‌.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, प्रा. नागेश कान्हेकर, प्रा.के. के.कदम, गिरीष लोडाया, सुनील गायकवाड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 

error: Content is protected !!