बाळापूर व शेवाळा येथे दिवंगत खासदार राजीव सातव यांना अभिवादन

0 26

 

 आखाडा बाळापूर,दि 21 (प्रतिनिधी)ःभारतीय राजकारणातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व अशी ओळख ठेऊन गेलेले काँग्रेस नेते दिवंगत खासदार राजीवभाऊ सातव यांच्या जयंती निमित्य आखाडा बाळापूर ग्रामपंचायत व शेवाळा ग्रा.प. च्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

बाळापूर येथील ग्रा.प.सभागृहात माजी शिक्षण सभापती संजय पाटील बोढारे यांचे हस्ते राजीव सातव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले,या वेळी युवा नेते संदीप नरवाडे,विठ्ठल पंडित ,पांडुरंग बोढारे,शिवा उघडे,माणिक पंडित, सुधीर पंडित,शेख अनवर,शिवशंकर सूर्यवंशी,पप्पू ग्रहपाल,शेख हरून ,रामभाऊ सूर्यवंशी ,सतीश खंदारेआदींची उपस्थिती होती. तर शेवाळा येथे मा.सरपंच अभय सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला या वेळी सरपंच अनंता नरवाडे,पंजाबराव सावंत,गजानन सूर्यवंशी,नागोराव लकडे,शेख इस्माईल,खालेदखान पठाण,भाऊराव सूर्यवंशी,शुभम सावंत,चंद्रकांत सूर्यवंशी,सोपी सूर्यवंशी,शिवा सूर्यवंशी,दिलीप सावंत,राजू चव्हाण,राम पतंगे,चांद्रमानी नरवाडे,अतुल गांजरे,मिलिंद दवणे,बालू नरवाडे,पिंटू गंजरे,रंगनाथ नरवाडे,व ग्रा.प.कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!