सिईओंच्या स्टेनोच्या बदलीसाठी संभाजी ब्रिगेडचे मंगळवारी ढोल बजाओ आंदोलन

0 48

परभणी,दि 17 ः
जिल्हा परिषदेच्या सीईओंचे स्टेनो वैजनाथ सदावर्ते यांची बदली करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी या मागणीसाठी  जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी (दि.20)  संभाजी ब्रिगेड ढोल बजाव आंदोलन करणार आहे.

जिल्हा परिषद सीईओ स्टेनो म्हणून काम पाहणारे वैजनाथ सदावर्ते हे नेहमीच वादग्रस्त म्हणून ओळखले जातात. संभाजी ब्रिगेडने यापूर्वी देखील विभागीय आयुक्तांकडे त्यांच्या तक्रारी केल्या होत्या, परंतु तत्कालीन प्रशासनाने त्यांच्या चौकशी अहवालावर पांघरून टाकल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. सदावर्ते हे यांची मूळ पदस्थापना आरोग्य भागात लिपिक या पदावर असताना त्यांना स्टेनोपदावर बढती दिली कशी असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने केला आहे. मागील दोन ते तीन वर्षात सदावर्ते यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, जिल्ह्याच्या विकास कामात अडथळे आणल्या प्रकरणी त्यांची चौकशी करून त्यांची मूळ विभागात बदली करावी, जिल्हा परिषदेला उच्च श्रेणीचे लघुलेखक असताना कनिष्ठ कर्मचाऱ्यास म्हणून नियुक्ती कशी काय दिली याची देखील चौकशी करावी अशी देखील मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

 प्रभारी सीईओ रश्मी खांडेकर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. बदली न झाल्यास आठ दिवसात जिल्हा परिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन  करण्याचा इशारा दिला होती.परंतु अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.त्यामुळे येत्या मंगळवारी (दि.20)  जिल्हा परिषदेसमो संभाजी ब्रिगेड ढोल बजाव आंदोलन करणार आहे. याबाबत प्रभारी सिईओंना  संभाजी ब्रिगेडने निवेदन दिले आहे.निवेदनावर विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड,मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड,विक्रम जैस्वाल,प्रसाद देव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सदावर्ते यांच्याबाबत अनेकदा तक्रारी येऊनही तत्कालीन सीईओ तसेच विद्यमान सिईओ यांनी देखील यावर कुठलीच कारवाई केली नसल्याने अनेक शंका उत्पन्न होत आहेत. यामुळेच संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून जिल्हा प्रशासन प्रशासन सदावर्ते  यांना का पाठीशी घालत आहे हे देखील येणाऱ्या काळात कळेलच.

error: Content is protected !!