संत चरित्र ग्रुप राज्य कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी हभप ज्ञानेश्वर माऊली सोनवणे तर सरचिटणीसपदी पत्रकार रामभाऊ आवारे यांची निवड

0 515

 

निफाड,दि 29 (प्रतिनिधी)ः
साधुसंतांचे विचार, आचार व महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले जावे त्यातून सर्वांच्या अध्यात्मिक ज्ञानात वृद्धी व्हावी ,त्याचबरोबर अध्यात्माची गोडी लागावी, अध्यात्मिक संस्कृती जोपासली जावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अखिलकोट ब्रम्हांडनायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अधिष्ठानाने व सर्व साधुसंतांच्या कृपाशीर्वादाने तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष हभप वाल्मिक महाराज जाधव ब्राह्मणगाव (सटाणा) व भागवतानुरागी ज्ञानसिंधू ह.भ.प.कविताताई साबळे वृंदावन आश्रम (कोपरगाव) यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य संतचरित्र ग्रुपची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती संत चरित्र ग्रुपचे महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख तथा दैनिक महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा निफाड तालुका प्रतिनिधी रामभाऊ विठ्ठलराव आवारे यांनी दिली आहे.

संत चरित्र ग्रुप राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे–
मुख्य मार्गदर्शक- हभप वाल्मीक महाराज जाधव ब्राह्मणगाव (सटाणा), मुख्य निरिक्षक- भागवतानुरागी हभप कविताताई साबळे सोनेवाडी (कोपरगाव),
अध्यक्ष- हभप ज्ञानेश्वर माऊली सोनवणे (धामोरी), उपाध्यक्ष- हभप मिनाताई मडके (शेवगाव), कार्याध्यक्ष- हभप शारदाताई सूर्यवंशी/ जाधव (नाशिक), कोषाध्यक्ष- हभप सिमाताई राजेंद्र काळे (चांदवड), चिटणीस-हभप माऊली कन्या दीपाली ताई घोडके (पुणे), सरचिटणीस तथा प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ विठ्ठलराव आवारे सर (वनसगाव), मुख्य संघटक—- हभप सविताताई पगार (मनमाड), सहसंघटक- हभप वर्षाताई काळे-कोकाटे (बीड),
मुख्य समन्वयक- हभप कविताताई गावंडे (मुंबई),
सहसमन्वयक–हभप कांताताई सोनटक्के (श्रीगोंदा),
संपर्कप्रमुख– प्रा लक्ष्मण विठ्ठलराव आवारे (चांदवड),
सहसंपर्कप्रमुख- हभप शंकर कोल्हे नैताळे (निफाड), निमंत्रक- हभप रावसाहेब जगताप मायगाव देवी (कोपरगाव), विश्वस्त- हभप अर्चनाताई जामोदे खामगाव (विदर्भ), विश्वस्त- हभप सुरेश पाटील ब्राह्मणगाव (सटाणा), विश्वस्त- हभप अलकाताई रानडे (सिन्नर),
विश्वस्त- हभप जयाताई घाडगे (नेवासा),कार्य सदस्य- हभप काशिनाथ मोरे वेळापुर (कोपरगाव),सदस्य- हभप मिनाक्षीताई बाळासाहेब शेळके ( सिन्नर), सदस्य- हभप नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे (निफाड) आदींचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

error: Content is protected !!