संत गाडगेबाबांचे कृतिशील जीवनकार्य सदैव प्रेरणादायीच-संतोष जाधव

0 115

परभणी,दि 21 (प्रतिनिधी)ः
संत गाडगे बाबांनी स्वच्छतेबरोबरच समाज प्रबोधन करून जनजागृती केली. आजही त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. बाबा जिथे जात तिथे परिसर स्वच्छतेबरोबरच सशक्त विचार देणारे किर्तन करून समाज जागृती करत असत. आजही स्वच्छतेसोबतच, शैक्षणिक क्षेत्र, अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीबद्दल जनजागृतीसाठी गाडगेबाबांचे विचारकार्य प्रेरणादायी ठरते. आज शासन अनुदान देऊन घरोघरी शौचालय बांधण्यासाठी प्रयत्नरत आहे. पण लोक फायदा घेताना दिसत नाहीत. शौचालय बांधुन वापर न करणे ही प्रवृत्ती चुकीची आहे. शहरातही सार्वजनिक शौचालय असून लोक त्यांचा वापर करताना दिसत नाहीत. चांगल्या आरोग्यासाठी लोकांना करोना डोस घेण्यासाठी आग्रह करावा लागतो. यामुळे आजही गाडगेबाबांचे विचार आमलात आणणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांनी 20 डिसेंबर रोजी शहरातील वसमत रस्त्यावरील कारेगांवकर संकुलमधील आबा ट्रेडर्स येथे स्मृतिदिनानिमित्त अभिवादनप्रसंगी केले.रणजित कारेगांवकर यांनी प्रास्ताविक मांडले आभार गजानन गरूड यांनी मानले.मुख्याद्यापक भगवान पवार, राजे संभाजी तालीमचे आण्णा डिघोळे, शिवाजीराव होनाळीकर, ज्ञानोबा बोबडे, चिद्रवार, मुंजा घाटुळ, शेख अनवर, रोहीत पाटील आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

error: Content is protected !!