नवीन इंग्रजी शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा

0 159

 

निफाड, रामभाऊ आवारे –

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील सबनीस यांनी संविधान दिन का साजरा केला जातो व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तर शाळेचे शिक्षक प्रतिनिधी उमेश कुलकर्णी यांनी संविधानाचे सामुहिक वाचन केले यावेळी शाळेतील शिक्षक किशोर कचवे यांनी विद्यार्थ्यांना संविधान व मुलभूत हक्क याबाबत मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी शाळेतील विद्यार्थिनी गायत्री बोके, संजना प्रसाद, मेंनका कश्यप यांनी तयार केलेले घोषवाक्याचे पोस्टर यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेतील शिक्षक भारती भोज, गीता दामले, हर्षदा दळवी, अश्विनी भामरे, संगीता वळवी, अविनाश सातपुते, शाळेतील वरिष्ठ लिपिक मधुकर हिरे, चंद्रभान गायकवाड, योगेश बंदरे, अरुण बंदरे व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!