अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या अध्यक्षपदी सतीश दाभाडे

महिला प्रांतिक अध्यक्षपदी निफाडच्या मंदा टकले

0 75

निफाड,दि 16 (प्रतिनिधी)ः
अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या अध्यक्षपदी नागपूरचे सतीश दाभाडे ,महिला प्रांतिक अध्यक्षपदी निफाडच्या मंदा गुलाब टकले, महासचिव पदी परभणीचे रमेश घटे, तर सोलापूरच्या विजय कालढोने यांची युवा अध्यक्षपदी पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीत एकमताने निवड करण्यात आली
कोष्टी समाज परिषदेची सर्वसाधारण सभा राष्ट्रीय कोष्टी फेडरेशनचे कोषाध्यक्ष पंडितराव इदाते यांच्या अध्यक्षतेखाली येवला येथील श्री चौडेंश्वरी मंदिर येथे संपन्न झाली
मान्यवरांच्या हस्ते श्री चौंडेश्वरी मातेची आरती व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली याप्रसंगी व्यासपीठावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा कोष्टी देवांग फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण वरोडे, विष्णू कुटे, अशोक सपाटे, मनोज भागवत, अमोल आसलकर, रोशन आदमाने ,गणेश खळेकर ,नारायणराव वड्डेसर उपस्थित होते दरम्यान मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मागील सभेचे प्रोसेडिंग गुलाबराव टकले यांनी वाचून दाखवल्यानंतर अध्यक्ष पंडित इदाते यांनी सन 19-20, 20- 21, 21-22 या तीन वर्षांच्या जमा खर्चाचा ताळेबंद सभेसमोर सादर केला
या दोन्ही ठरावास उपस्थित सभासदांनी एकमताने मान्यता दिली याप्रसंगी परभणी ,देऊळगाव राजा ,बीड गंगाखेड, बार्शी, वडवणी ,भूम, उमरखेड , वाशिम, दिग्रस दारव्हा, अमरावती, अकोला , नागपूर येवला, विटा ,सांगली ,नांदेड ,नाशिक ,पुणे, इचलकरंजी कोल्हापूर यासह महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!