मोठी बातमी : पुण्यात शाळा- महाविद्यालये बंदच

0 89

पुणे – कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या करोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पुण्यातील सध्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के आहे. किमान आठ दिवस तरी पुण्यातील वाढती रुग्णसंख्या कमी होणार नसल्याची आरोग्य विभागाची माहिती असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. रुग्णसंख्या वाढते आहे मात्र रुग्णालयात दाखल रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही खबरदारी म्हणून तूर्त पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाळांसंबंधीची माहिती सोशल मिडीयाद्वारे दिली. त्यांनी ट्विट करत सांगितले की, ‘करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.’

error: Content is protected !!