‘या’ कंपन्यांच्या Wi-Fi राउटरची सुरक्षा धोक्यात…. हॅकिंगचे संकट…. तुमच्याकडे तर नाही यापैकी एक…

0 363

शब्दराज वेब टीम – गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांमुळे लोकांचे खूप नुकसान झाले आहे आणि त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशात माहिती समोर आली आहे की, हॅकर्स लोकांच्या घरात बसवण्यात आलेल्या वायफाय राउटरच्या माध्यमातून लोकांचा डेटा हॅक करत आहेत. हॅकर्सकडून वायफाय राऊटरला लक्ष्य केलं जात आहे. एका संशोधनात वायफाय राऊटरच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलं आहे. काही कंपन्यांचे वायफाय राऊटर हॅकर्स (Hacker) साठी सोपं लक्ष्य बनले आहेत. यामुळे वायफाय नेटवर्कच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. आयओटी (IoT) इन्स्पेक्टर आणि चिप मॅगझिनला सुरक्षा संशोधकांच्या टीमने ही माहिती दिली आहे.

pune lok1

एका नवीन अहवालात असं आढळून आलं आहे की, सुमारे 226 सुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर विविध ब्रँडचे लाखो वायफाय राऊटर धोक्यात येऊ शकतात. या नव्या संशोधन Netgear, Asus, Synology, D-Link, AVM, TP-Link आणि Edimax यासह मोठ्या ब्रँडमधील अनेक WiFi राऊटरच्या सुरक्षेबाबत धोक्यांची घंटा दिली आहे. IoT इन्स्पेक्टर CTO फ्लोरियन लुकोव्स्की यांनी या संशोधनाबाबत अधिक माहिती दिली की, “या तपासणीदरम्यान लहान व्यवसाय आणि होम राऊटर सुरक्षेती अयशस्वी ठरले आहेत. सर्व बग (Bug) धोकादायक नसतात. चाचणी दरम्यान, सर्व राऊटरने गंभीर सुरक्षा बग दाखवले. ज्यामुळे हॅकर्सचे काम सोपे होऊ शकते.” अहवालानुसार, याचे मुख्य कारण नवीन घटकांची कमतरता असणे देखील अपेक्षित आहे, ज्यामुळे हॅकर्सना या राऊटरच्या सेवेमध्ये अडथळा आणणं सोपं होतं.

shabdraj reporter add

अहवालात असेही समोर आले आहे की, यापैकी बहुतेक कंपन्या अतिशय साधे पासवर्ड वापरतात. ‘अॅडमिन’ आणि ‘१२३४ ‘ सारखे पासवर्ड इतके सामान्य आणि अंदाज लावायला सोपे आहेत की हॅकर्स त्यांचा सहज अंदाज लावू शकतात. कंपन्याच हे पासवर्ड फक्त टाकत नाहीत, युजर्सही हे पासवर्ड वापरतात. म्हणून, सर्वप्रथम, तुमच्या वायफाय राउटरचा पासवर्ड बदला आणि सहज ओळखता येणार नाही असा पासवर्ड सेट करा. अहवालात असंही समोर आलं आहे की,” विक्रेते राऊटरवर साधे डीफॉल्ट पासवर्ड वापरत होते. ज्यामुळे हॅकर्सना अंदाज लावणं सोपं होतं.

राऊटरबाबतचे नवीन संशोधन आणि निष्कर्ष संबंधित कंपन्याना कळवण्यात आल्या. यानंतर सर्व कंपन्यांनी प्रभावित मॉडेल्ससाठी एक उपाय शोधण्यासाठी त्वरित प्रतिसाद दिला. यामध्ये Asus, D-Link, Edimax, Linksys, Netgear, Synology आणि TP-Link यांचा समावेश आहे. नवीन अपडेट लागू करण्यासाठी आणि संभाव्य हल्ले टाळण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांच्या वायफाय राऊटरचे फर्मवेअर शक्य तितक्या लवकर अपडेट केले पाहिजे. हा अहवाल IoT Inspector आणि CHIP मॅगझिनच्या सुरक्षा संशोधकांच्या टीमने तयार केला आहे.

error: Content is protected !!