गजानन गोंगे व तुकाराम गिराम यांची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

0 26

रमेश बिजुले
पाथरी,दि 29 ः
तालुक्यातील पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गजानन गोंगे जलतरण स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम तर तुकाराम गिराम जिल्हा जलतरण स्पर्धेत जिल्ह्यातुन दुसरा आल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.शाळेतील गजानन गोंगे आणि तुकाराम गिराम च्या विजयाची बातमी कळताच त्यांचे व शाळेचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
सविस्तर बातमी अशी की,क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा स्पर्धा परभणी व्दारा आयोजीत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 च्या वतीने आज दी- 28 नोव्हेंबर रोजी परभणी येथे घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहेटाकळी येथिल गजानन गोंगे या विद्यार्थ्याने 50 मिटर व 200 मिटर फ्री स्टाईल या जिल्हा जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असुन याच शाळेतील दुसरा विद्यार्थी तुकाराम गिराम या विद्यार्थ्यांचा 100 मिटर या जलतरण स्पर्धेत द्वितीय आला असुन या दोन्हीही विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.ही बातमी सर्वत्र कळताच जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे,पाथरी गटसाधन केंद्राचे गटशिक्षण अधिकारी राठोड साहेब, केंद्र प्रमुख दत्ता होंगे,गावच्या सरपंच प्रणिताताई शामराव गोंगे, उपसरपंच गणेश बागल,शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजेभाऊ गोंगे,माजी सरपंच भिमराव गोंगे,शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश अंभुरे सर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर गोंगे,अजित खारकर सर,रतन कदम सर,श्रिकांत मिसे सर,सुदाम शिंदे सर, अशोक डांबे सर,प्रतिमा पानझाडे,अशोक गोरे सर गावकऱ्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!