परभणीत शनिवारी रिपब्लिकन सेनेचा स्वाभिमानी मेळावा

रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांची माहिती

0 35
परभणी/प्रतिनिधी
प्रियदर्शनी सम्राट अशोक यांच्या जयंती उत्सव सोहळा व रिपब्लिकन सेनेच्या स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन शनिवारी (दि.25) राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी रिपब्लिकन सेना कामगार आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष तथा जयंती महोत्सवाचे आयोजक महेंद्र सानके, राज्य संघटक यशवंत भालेराव, जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी, शरद चव्हाण, चंद्रकांत लहाने यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
परभणी येथे शनिवारी (दि.25) दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी मैदानात अनेक मान्यवरांच्या चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लीकन सेनेच्या विभागीय स्वाभिमानी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये अल्पसंख्यांक व मागासवर्गीयावर होत असलेल्या अन्याय अत्याचारासंबंधात तसेच आगामी जिल्हा परिषद व पंं. स., महानगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकांची निर्णायक भूमिका ठरवण्यासाठी या स्वाभिमानी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे हे राहणार असून केंद्रीय संघटक संजीव बोधनकर, प्रमुख मार्गदर्शक सागर डबरासे, प्रमुख निर्देशक तथा पक्षाचे सचिव प्रा. युवराज धसवाडीकर, संघटक यशवंत भालेराव हे उपस्थित राहतील. कामगार आघाडी प्रमुख युवराज बनसोडे, मराठवाडा अध्यक्ष माधव जमदाडे, श्रीपती टोले, किरण घोंगडे संजय देखणे, अॅड. रविंद्र पाटोळे, अॅड. एम. जी. सोनकांबळे, अमोल घुगे, चंद्रकांत रुपेकर, आशिष वाकोडे, मधुकर झगडे, रमेशराव पैठणे आदींची उपस्थिती राहणार आहे.
श्री.वाकोडे यांनी सांगितले की, सम्राट अशोक यांचा काळ देशासाठी सुवर्णकाळ होता. त्यांनी 84 हजार बौध्द विहारे बांधली. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी इतर जयंत्यांप्रमाणे शासनाने सम्राट अशोक यांची जयंती साजरी केली पाहिजे. शासनाने नव्याने कंत्राटी पध्दतीने नोकर भरती करण्याचा घेतलेला निर्णय विघातक असून एस.सी., एस.टी., ओबीसी समूहाचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी खाजगीकरणाला विरोध करण्यासंदर्भात मेळाव्यात चर्चा होणार आहे. तसेच दलित व मागासवर्गियांची सर्व कर्जे माफ करावीत.अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
error: Content is protected !!