महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेत सेलू उप विभागाला घवघवीत यश

संगेवार यांना पाच तर झांपले यांना दोन वैयक्तिक पुरस्कार

1 52

सेलू,दि 17 (प्रतिनिधी)ः
नुकत्याच औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या महसूल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023 मध्ये सेलू उपविभागाला घवघवीत यश प्राप्त झाले असून उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांना वैयक्तिक पाच तर तहसीलदार दिनेश झांपले यांना दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
औरंगाबाद येथे दिनांक ८ ते १० जानेवारी दरम्यान महसूल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये सेलू उपविभागालां घवघवीत यश प्राप्त झाले असून उपविभागाच्या उपजिल्हाधिकारी सौ. अरुणा संगेवार यांना वैयक्तिक महिला थ्रो बॉल मध्ये प्रथम, बॅडमिंटन दुहेरी मध्ये द्वितीय थाळीफेक मध्ये प्रथम टेबल टेनिस मध्ये तृतीय धावणे रीले या स्पर्धेमध्ये तर तहसीलदार दिनेश झापले यांना वैयक्तिक पोहण्याच्या स्पर्धेत प्रथम तर 45 वर्षावरील स्पर्धेत द्वितीय पुरस्कार मिळाले असून एकूण 17 पुरस्कार उपविभागात प्राप्त झाले आहेत.
याव्यतिरिक्त कोतवाल अर्चना गायकवाड यांना महिला थ्रो बॉल मध्ये उपविभागीय अधिकारी संगेवार यांचे सोबत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. 100 मीटर व 400 मीटर धावणे मध्ये शशांक कोतवाल यांना प्रथम व द्वितीय तर अव्वल कारकून पिंपळे तलाठी खवले ईप्पर भवर व गायकवाड यांना संचलनाचा तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. तर खो-खो महिला गटात तलाठी बेलदार, कीर्तनकार, व अर्चना गायकवाड यांना पहिला पुरस्कार मिळालेला आहे. तर क्रिकेट मध्ये तलाठी युनूस व राम घुले यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे तर गायनामध्ये अर्चना गायकवाड यांना विशेष पुरस्कार दिल्या गेला आहे. याशिवाय समूह नृत्य संतोष गायकवाड व अर्चना गायकवाड यांना तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. तर नाटिका स्पर्धेत तलाठी अंजली लाड व अवलकारकून पिंपळे तसेच मंडळ अधिकारी सोनवणे यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे.
समूहगीत गायनात महसूल सहाय्यक आशिष राठोड वसीम अक्रम यांना तिसरा पुरस्कार देण्यात आलेला आहे. टेबल टेनिस मध्ये प्रकाश अय्या यांना तिसरा पुरस्कार मिळालेला आहे तर फुटबॉल स्पर्धेत तलाठी युनूस व महसूल सहाय्यक वसीम आक्रम यांना द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे.
महसूल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना देखील घवघवीत यश प्राप्त झाले असून याबद्दल उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार व तहसीलदार दिनेश झांपले यांच्यासह पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!