डेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादव यांच्या प्रयत्नातून सेलूत साकारले

0 121

परभणी :- दि. 30 जुलै
परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच तालुक्यांमध्ये वृक्ष लागवडी साठी विविध अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आधारित सेलू येथील पंचायत समितीच्या परिसरात स्वस्तिक पद्धतीच्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

दिनांक 29 जुलै 2022 रोजी पंचायत समिती सेलू येथील नवीन शासकीय निवासस्थानाच्या परिसरामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या विशेष प्रयत्नांमधून आणि पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक दायित्वामधून जिल्ह्यात एकमेव नाविन्यपूर्ण अशा स्वस्तिक उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

स्वस्तिक उद्यानाचे काय आहेत फायदे
स्वस्तिक आकारात वृक्ष लागवड केल्यामुळे स्वस्तिकाच्या चार पाकळ्यांमध्ये जागा उपलब्ध राहते त्या जागेचा उपयोग लॉन करण्यासाठी, मुक्त व्यायाम शाळा तयार करण्यासाठी, पेव्हर ब्लॉक टाकून वन भोजनासाठी होऊ शकतो.

स्वस्तिक उद्यान निर्मितीची अशी आहे पद्धत
100 फूट x 100 फूट जागा निवडल्यास सुमारे 800 फूट अंतराची कडा मिळते. यावर चार फूट अंतरावर एक झाड लावल्यास दोनशे वृक्षांची लागवड करता येते. या पद्धतीमध्ये 10 प्रकारची फुल झाडे, 10 प्रकारची फळ झाडे अशा 20 प्रकारच्या प्रत्येकी 10 वृक्ष प्रमाणे 200 वृक्षांची लावता येऊ शकतात.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) ओमप्रकाश यादव यांच्या नेतृत्वात सेलू पंचायत समितीच्या नवीन झालेल्या निवासस्थानाच्या परिसरात स्वस्तिक उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे आहे. यावेळी सेलू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विष्णू मोरे पाथरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब खरात, सेलूचे कार्यालयीन अधीक्षक श्यामसुंदर बोराडे, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी तोटेवाड, श्रीमती भोसले, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी आणि तालुक्यातील ग्रामसेवक मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्वस्तिक उद्यानाचे सामाजिक दायित्व कार्यालयीन अधीक्षक श्यामसुंदर बोराडे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी करत आहेत.

 

स्वस्तिक पॅटर्न वृक्ष लागवडीचा हा परभणी जिल्हातील पहिलाच प्रयोग असून या मध्ये कमीजागेत जास्त वृक्षांची लागवड करता येते तसेच वापरासाठी जागा सुद्धा उपलब्ध होते.

ओमप्रकाश यादव
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा )
जिल्हा परिषद परभणी

error: Content is protected !!