शब्दगंधचे साहित्यिक कार्य प्रेरणादायी-प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये

0 52
श्रीरामपूर, प्रतिनिधी – ग्रामीण भागातील नवोदितांना मार्गदर्शन करून त्यांना संधी देऊन साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शब्दगंध गेली पंधरा वीस  वर्षांपासून प्रयत्नशील असल्याने अनेकांची पुस्तकं आली, नवोदित. मान्यवर झाले, साहित्य रसिकांना आनंद देण्याचं काम या माध्यमाद्वारे झाले आहे असे मत  प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
 
 
    शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर ची बैठक नुकतीच मावळते अध्यक्ष प्रा.मिराबक्ष शेख यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक सचिव सुनील गोसावी, प.स च्या सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे,खजिनदार भगवान राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
     यावेळी सर्वानुमते नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. शब्दगंधच्या श्रीरामपूर तालुका शाखा अध्यक्षपदी प्रा.लेविन भोसले, उपाध्यक्षपदी कवी रज्जाक शेख, कार्याध्यक्षपदी संगीता फासाटे, सचिवपदी आनंदा साळवे, सहसचिवपदी बाबासाहेब पवार, खजिनदारपदी महेश कुलकर्णी प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेंद्र देसाई यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून हाजी इसाकभाई शेख, डॉ.सलीम शेख तर सल्लागार प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, मेजर कृष्णा सरदार, डॉ. वंदना मुरकुटे, सुभाष गायकवाड, निवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर ससाने,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव माळी आदींची निवड करण्यात आली.
 संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन नियमावलीचे पालन करावे असे आवाहन केले.
 श्रीरामपूर तालुका कार्यकारी पदाधिकारी यांनी अहमदनगर जिल्हा कार्यालयाशी संलग्न राहून कामकाज करावे अशी सूचना मांडली. भगवान राऊत यांनी  कलाकार मानधन तसेच संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली.आभार कवी आनंदा साळवे यांनी मानले. सूत्रसंचालन कवी रझाक शेख यांनी केले.
error: Content is protected !!