एचएआरसी संस्थेच्या पुढाकारातून मिळणार माझं घर प्रकल्पास निवारा

0 23

परभणी, दि 16 मार्च 2023
एचएआरसी संस्था, परभणी यांच्या पुढाकारातून ‘माझं घर’ या प्रकल्पासाठी लातूर जिल्ह्यातील बुधोडा ता औसा येथे निवारा गृह उभारण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाले असून 19 मार्च रोजी याचा शुभारंभ व लोकार्पण होणार आहे. या निवारा गृहासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने समाज माध्यमावर आवाहन केले होते ज्यास संपूर्ण महाराष्ट्रातून दात्यांनी दिलेल्या मदतीतून सात लाख रुपयांची मदत केली आहे.

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज ही संस्था 2010 पासून समाजातील वंचित, अनाथ, दुर्धर आजारग्रस्त बालके व निराधार महिलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन सोबत स्वयंरोजगार व प्रशिक्षण साठी कार्यरत असून आजवर त्यांना सर्वतोपरी लोकसहभागातून मदत केली आहे.
शरद झरे व संगीता झरे यांच्या ‘माझं घर’ प्रकल्पाच्या माध्यमातून जून 2021 पासून शिक्षणापासून वंचित मुलांसाठी, शाळाबाह्य व एकल पालक मुलांसाठी निवासी शाळेच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण व पुनर्वसनासाठी वाणटाकळी तांडा व काटगाव तांडा येथे उभारलेल्या प्रकल्पातून प्रयत्न करत असून आजवर विविध शैक्षणिक प्रयोगातून त्यांनी त्या मुलांची शैक्षणिक प्रगती साधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
एचएआरसी संस्थेने जून 2021 पासून या बालकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षण व पुनर्वसनासाठी वेळोवेळी गरजेनुसार सर्वतोपरी मदत केली आहे.
फेब्रुवारी 2023 मध्ये माणूस प्रतिष्ठान संस्थेने त्याना वांगजेवाडी ता औसा जि लातूर येथे 1/- भाडेतत्त्वावर मिळालेल्या जमिनीवर 100 वंचित मुलांसाठी निवासी निवारा गृह उभारण्यासाठी एचएआरसी संस्थेला विनंती केली होती. तिथे 4 हजार square feet चा बहुउद्देशीय निवारा गृह उभा राहील जिथे या मुलांची निवारा ची सोय सोबत शिक्षणाचे धडे देता येईल.
या कार्यासाठी अंदाजे सात ते साडे सात लाख खर्च अपेक्षित होता.
यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. ज्यास दात्यांच्या चांगला प्रतिसाद दिला. व यासाठी एचएआरसी संस्थेने सात लाख रुपये डोनेशन मधून 4000 square feet इतका भव्य सर्व सुविधा युक्त निवारा गृह बांधून दिला.

19 मार्च रविवारी रोजी या निवारा गृहाचा शुभारंभ होत आहे.
यावेळी डॉ.विठ्ठल लहाने यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.अध्यक्षस्थानी समाजवादी नेते सुभाष भिंगे उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रा शिवा आयथळ,डॉ लीना बगाडीया,डॉ.प्रमोद मुळे,डॉ.पवन चांडक,हरिषचंद्र सुडे,शेषराव चव्हाण, डॉ.वसुंधरा गुडे,लक्ष्मणराव वंगे,सुवर्णा जगताप,मनोहर बदामेे आदी उपस्थित राहणार आहेत.

माझं घर चे प्रमुख श्री शरद झरे या प्रसंगी बोलताना म्हणाले की,” एचएआरसीचे प्रमुख डॉ. पवन चांडक व दाते डॉ लीना बगाडीया यांच्या मदतीमुळे आमच्या निवारा गृहाचे काम जलद मार्गी लागले आहे. आजावर एचएआरसी संस्थे तर्फे सात लाख रुपयांची मदत झाली आहे. या निवारा गृहामुळे १०० बालकांच्या निवासाचा प्रश्न सुटणार आहे. मुलांचे निवास, शिक्षण तसेच बहुऊदेशीय सभागृह असाही उपयोग होणार आहे. या कामी सहकार्य केल्याबद्दल एचएआरसी संस्था, डॉ. लीना बगाडीया मँडम, डॉ. पवन चांडक , प्रकाशवाटा ग्रुपवरील सर्व दात्यांचे माणूस या संस्थेच्या वतीने शरद झरे यांनी आभार मानले.”

या प्रसंगी डॉ पवन चांडक म्हणाले “शिक्षणापासून वंचित 100 बालकांसाठी हक्काचे घर व्हावे ही प्रा शिवा आयथळ सरांची इच्छा होती. म्हणून केलेल्या आवाहनास एचएआरसी संस्थेचे सदस्य व दाते यांनी दिलेल्या मदतीबद्दल आभारी आहे. विशेषतः मुंबई येथील डॉ लीना बगाडीया मॅडम, डॉ सतीश पंचधार, प्रा दिलीप राके, प्रा शिवा आयथळ, सत्यंजय हर्षे, शैलेश वट्टमवार, रवी मौर्य, सचिन त्यागी, मल्हार कुलकर्णी, मीनल मोहन, गणेश आहेर, मल्हार कुलकर्णी, डॉ महेश अवचट, राजेश्वर वासलवार, वासुदेवानंद प्रभू, किरण जाधव, ऍड चंद्रकांत राजुरे, उल्हास खंबायतकर, सौ रोहिणी मुक्कीरवार,अंबरेश्वर राठी, मुकेश आलेगावकर, सौ निशा सोनी, चंद्रकांत अमीलकंठवार, मुकुंद कुलथे, श्रीमती शोभा सुळसुळे, नितीन देशमुख आदी दात्यांचे मोलाचे सहकार्य लाभले”.

error: Content is protected !!